Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमील शेख हत्येच्या फेरतपासाचे आदेश जारी; मुलींनी मानले आव्हाडांचे आभार

जमील शेख हत्येच्या फेरतपासाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्या मुलींनी डॉ. जितेंद्र आव्हाड आणि फडणवीस यांचे आभार मानले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 20, 2025 | 08:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरतपासाचे आदेश दिल्यानंतर शेख कुटुंबीयांच्या आशा पुन्हा उजळल्या आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायरा यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन त्यांच्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले. या प्रकरणाला विधानसभेत आवाज देऊन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानेच फेरतपासाची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येतील’; शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान

जोबिया आणि जायरा यांनी सांगितले की, “आमच्या आक्रोशाला न्यायाच्या दिशेने वळविण्याचे काम डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. मुख्यमंत्र्यांनीही आमच्या व्यथेची दखल घेत तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्ही त्यांच्या ऋणी आहोत.” त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र तयार केले असून, ते पत्र डॉ. आव्हाड यांच्यामार्फत फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही केली.

शेख कुटुंबीयांचा लढा विधिमंडळात लढल्याबद्दल दोघींनी डॉ. आव्हाड यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तो नम्रतेने नाकारत “ये तो बस अंगडाई है, और लडाई अभी बाकी है,” असे म्हणत लढा अद्याप संपलेला नसल्याचे स्पष्ट केले. आव्हाड यांनी तपासाच्या पूर्वस्थितीकडे लक्ष वेधले आणि हे प्रकरण पोलीसांनी योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा आरोप केला.

“जमील शेख यांच्यावर 2014 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ‘आका’चे नाव घेतले होते, तरीही कारवाई झाली नाही. आजही मुख्य सूत्रधार मोकळा आहे,” असे सांगत डॉ. आव्हाड यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांनी तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे सांगून तपास एका व्यक्तीकडे न देता तीन अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम तयार करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली.

20 दिवसांपासूनच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप! दिवा स्थानकावर रेल रोकोचा इशारा

शेख कुटुंबीयांनी या लढ्यात त्यांना साथ देणाऱ्या वैभवी देशमुख यांचेही आभार मानले. तसेच, त्यांनी सध्या तपास करत असलेल्या अधिकाऱ्यावर अविश्वास व्यक्त करून, चौकशी योग्य अधिकाऱ्यांच्या हाती सोपवावी, असेही सांगितले. आता त्यांच्या न्यायाची आशा मुख्यमंत्र्यांकडे लागून आहे.

Web Title: Jamil sheikh murder re investigation order issued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 08:23 PM

Topics:  

  • jitendra avhad
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
1

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू
2

Thane Mhada: घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ठाण्यात 44-46 लाखांत म्हाडाची घरं; नव्या लॉटरीची तयारी सुरू

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन
3

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.