Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी खेळाडूंना मिळाले व्यासपीठ; उल्हासनगरात डेडलिफ्ट स्पर्धेचे आयोजन

उल्हासनगरात आयोजित डेडलिफ्ट चॅम्पियनशिपला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी या स्पर्धेने खेळाडूंना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 10, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • उल्हासनगरात प्रथमच डेडलिफ्ट चॅम्पियनशिपचे आयोजन
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्यासाठी व्यासपीठ
  • पॉवरलिफ्टिंग क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
 

उल्हासनगरच्या क्रीडा इतिहासात प्रथमच ऑल इंडिया ओपन व संयुक्त महाराष्ट्र राज्यस्तरीय सिंगल लिफ्ट डेडलिफ्ट चॅम्पियनशिपचे भव्य आयोजन करण्यात आले. रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडिया, रतन हेल्थ क्लब, जस्ट फिटनेस आणि रॉ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडली. शहरातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

उल्हासनगरचे प्रसिद्ध फिटनेस आयकॉन दीपक दीक्षित यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नगरसेवक महेश सुखरामानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजन समितीच्या वतीने महेश सुखरामानी यांचा ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीने खेळाडूंमध्ये उत्साह

महेश सुखरामानी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि क्रीडाभावना जोपासत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्हासनगरचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. या भव्य स्पर्धेसाठी रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष जगप्रीत सिंह (हरियाणा) आपल्या संपूर्ण टीमसह उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने खेळाडूंमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. जसप्रीत सिंह, तरनदीप सिंह, अमित बजाज आणि अनमोल सिंह यांनी स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या वाहतुकीला मिळणार नवी दिशा; खारघर-तुर्भे टनेल लिंक रोडचे काम ३२ टक्के पूर्ण

विविध शहरांमधून १०० हून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी

हरियाणा, दिल्ली, पंजाब, जळगाव, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण यांसह विविध शहरांमधून १०० हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला, देशाच्या विविध भागांतून खेळाडू उल्हासनगरमध्ये दाखल झाल्याने शहराच्या क्रीडा क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली. या कार्यक्रमाला फिटनेस आयकॉन मनीष अडविलकर, शेखर भोईर, अभिनेता अमित लेखवांज तसेच विश्वविजेते दीपक बासिस्ट यांचे विशेष मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले.

Maharashtra Heritage: घोडबंदर किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात? ‘रिल्स’च्या वाढत्या वापरावरून चिंता; कडक सुरक्षेची मागणी

दीक्षित यांची फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

या स्पर्धेदरम्यान एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. दीपक दीक्षित यांची रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडियाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच संजय डाभोलकर यांची संयुक्त सचिवपदी, तर सतोष कुमार नंदा आणि अमित मोटवानी यांची संघटनेच्या विविध महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी आपल्या ताकदीचा आणि कौशल्याचा दमदार प्रत्यय देत उत्कृष्ट कामगिरी केली. अनेक खेळाडूंनी सुवर्णपदकावर नाव कोरत उपस्थितांची मने जिंकली, त्यांच्या दमदार कामगिरीमुळे प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. या चॅम्पियनशिपचे आणखी एक वैशिष्ट्‌य म्हणजे इंग्लंड आणि बैंकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धासाठी निवड चाचणी याच ठिकाणी घेण्यात आली. त्यामुळे सहभागी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उल्हासनगरात डेडलिफ्ट चॅम्पियनशिप का आयोजित करण्यात आली?

    Ans: शहरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

  • Que: डेडलिफ्ट चॅम्पियनशिपचे आयोजन कोणी केले?

    Ans: रॉ पॉवरलिफ्टिंग फेडरेशन इंडिया, रतन हेल्थ क्लब, जस्ट फिटनेस आणि रॉ पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

  • Que: स्पर्धेचा प्रमुख उद्देश काय होता?

    Ans: खेळाडूंना क्रीडा कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ देणे आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश होता.

Web Title: Ulhasnagar deadlift championship national international platform for players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
2

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
3

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
4

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.