
फोटो सौजन्य- chatgpt
देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रति तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियानांतर्गतभारतीय जवान व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेख अभियान’ राबविण्यात आले. मंगळवार ११ ऑगस्ट रोजी शहरातील विविध मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर जवान व पोलिसांना पत्रे लिहून त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि देशसेवेला मनापासून सलाम केला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि सैनिकांप्रति आदराची भावना रुजविणे तसेच देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. उपायुक्त डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
मनपा शाळा क्र. १. शाळा क्र. ६०, बाळकुम, शाळा क्र. ११ राबोडी, शाळा क्र. ६४, शाळा क्र. ५५ आझाद नगर, शाळा क्र. ६२ कासारवडवली, शाळा क्र. ५६ ओवळा, शाळा क्र. ५८ भाईंदरपाडा, शाळा क्र. ७५, शाळा क्र. ९८, गौतम हिंदी स्कूल, आदर्श इंग्लशि स्कूल या विविध शाळांमध्ये जवान व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखनाचे आयोजन करण्यात आले. सर्व शाळांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परबवाडी येथील शाळा क्र. १८ मध्ये हा उपक्रम विशेष उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल सख्ये, स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, वागळे पोलिस स्टेशनच्या आरटीओ पोलिस अधिकारी मुल्ला तसेब इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. तसेच गटाधिकारी संगीता बामणे, यूआरसी-२चे प्रमुख रवींद्र पाटील, गटप्रमुख नीलिमा पाटील आणि सीआरसी समन्वयक आशा पाटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढविला.
पत्रलेखन उपक्रमात विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डचा वापर करून जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना मनापासून पत्रे लिहिली. देशाच्या सीमेचे रक्षण करताना जवानांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे धैर्य, त्याग आणि देशसेवा याबद्दल विद्याथ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘आपल्या देशसेवेला मनःपूर्वक सलाम’, ‘आपण आमचे खरे हिरो आहात, अशा भावनिक शब्दांत विद्यार्थ्यांनी जवान व पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत असल्याची जाणीवही विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली. विविध शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पत्रलेखनासाठी प्रोत्साहित केले. विद्याथ्यर्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार आणि भावनेनुसार पत्रे लिहिली. काही विद्यार्थ्यांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांना शुभेच्छा दिल्या, तर काहींनी देशाच्या सीमेचे रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन अभियान राबविण्यात आले.
Ans: विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय अभिमान आणि जवान-पोलिसांप्रति आदराची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
Ans: देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या जवान आणि पोलिसांच्या योगदानाची जाणीव, देशप्रेम आणि कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली.