Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश

सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या यात्रेत वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 12, 2026 | 09:23 PM
जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला! वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
Follow Us
Follow Us:

 

  • जतमध्ये यात्रेवर काळाचा घाला!
  • वादळामुळे निवारा शेड कोसळून ६ भाविकांचा मृत्यू
  • मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश
जत : मरगुबाई देवीच्या यात्रेसाठी भक्तिभावाने, आनंदाने आणि नवस फेडण्याच्या श्रद्धेने जमलेल्या भाविकांवर काळाने अक्षरशः झडप घातली. जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मंदिर परिसरात उभारण्यात आलेला भाविकांचा निवारा शेड अचानक आलेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि काही क्षणांतच यात्रेचे आनंदमय वातावरण किंकाळ्या, आक्रोश आणि अश्रूंनी भरून गेले. या भीषण दुर्घटनेत आता मृतांचा आकडा सहावर पोहोचला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या हृदयद्रावक दुर्घटनेत शंकर आबा लोखंडे (वय ८०, रा. पांडोझरी, ता. जत), मंगल भाऊसाहेब मोटे (वय ४५, रा. पांडोझरी, ता. जत), संगीता राम चौधरी (वय ४२, रा. टक्कळकी, ता. तिकोट), अरुण विष्णू गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजापूर), सोन्या लक्ष्मण गेजगे (वय १४, रा. डोमनाळ, विजापूर) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (वय ६५, रा. दारिबडची) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे, यात्रेचा आनंद अनुभवण्यासाठी आलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या दुर्घटनेने अनेकांना अश्रू अनावर झाले.

जतमध्ये दिवसाढवळ्या ‘बिबट्या सदृश्य’ प्राण्याचे दर्शन; साखर कारखाना परिसरात भीतीचे सावट

मिळालेल्या माहितीनुसार, मरगुबाई देवीच्या यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविक मोटेवाडी येथे जमले होते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात मोठा निवारा शेड उभारण्यात आला होता. मात्र, अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने हा शेड काही क्षणांत कोसळला. त्याखाली उभे असलेले अनेक भाविक दबले गेले आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

आरडाओरड, मदतीसाठी होणाऱ्या हाका आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तत्काळ मदतकार्य सुरू केले. लोखंडी पाइप, पत्रे आणि शेडखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्घटनेत राजू राम चौधरी (वय २६) आणि बिराप्पा भाऊसाहेब मोटे (वय २२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. यात्रेसाठी जमलेल्या भाविकांवर अचानक ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावोगावी हळहळ व्यक्त होत आहे.

Sangli Crime: आंतरजातीय विवाहाचा भयानक शेवट! चारित्र्य संशयातून पतीने 20 वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

Web Title: Jat motewadi margubai devi yatra shed collapse 6 died sangli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • Accident Case
  • sangli news

संबंधित बातम्या

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
1

साखर पुरवठा करण्याचे आमिष दाखवून ९ कोटीची फसवणूक, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Big Breaking: परभणी हादरली! मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला अन् 30 ते 40…; 5 भाविकांचा मृत्यू
2

Big Breaking: परभणी हादरली! मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला अन् 30 ते 40…; 5 भाविकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.