Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीत २१ ऑगस्टला शेतकरी मोर्चा! राजू शेट्टी आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार एल्गार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 12, 2026 | 06:13 PM
राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’
  • राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
  • वाचा सविस्तर बातमी!
सांगली : शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्यास तीव्र विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अन्य घटकांच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील आणि संदीप राजोबा उपस्थित होते. या मोर्चाला खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम उपस्थित राहणार असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या खर्चावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “४२ हजार कोटी रुपयांत होणारा रस्ता एक लाख दहा हजार कोटी रुपयांपर्यंत नेला जात आहे. या प्रकल्पाचा डीपीआर योग्य असल्याचा विश्वास सरकारने किमान आयआयटी किंवा अन्य विश्वासार्ह संस्थेच्या माध्यमातून जनतेला द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

सरकारकडून मोठ्या प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. “मोठ्या उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली जातात; मग शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांबाबतही तोच नियम का लावला जात नाही?” असा सवाल त्यांनी केला. कर्जमाफीबाबत सरकारने केवळ आकडे न सांगता लाभार्थी शेतकऱ्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

Raju Shetty Satara Politics: सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शेतकरी पेटले; राजू शेट्टींच्या नेतृत्वात लाँगमार्चची घोषणा

महापुराचा धोका वाढण्याची भीती

शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णा खोऱ्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली. “पाण्याचे नैसर्गिक प्रवाह आणि नाले अडवले गेले तर नव्या संकटांना सामोरे जावे लागेल. कृष्णा नदीच्या पाणीपातळीवर या रस्त्याचा परिणाम होऊ शकतो. हिप्परगी येथे एक दरवाजा बंद असला तरी सांगलीपर्यंतची जमीन पाण्याखाली जाते. हा रस्ता झाल्यास भविष्यात कराडपर्यंतचा भागही दरवर्षी पूरबाधित होण्याचा धोका आहे,” असा दावा शेट्टी यांनी केला.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून, सिंचनाच्या सुविधा निर्माण करून आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने कृष्णा, वारणा यांसारख्या नद्यांच्या खोऱ्यातील जमीन सुपीक केली आहे. “अशा जमिनी केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी हातच्या जाऊ देणार नाही. शेतकऱ्यांची जमीन घेऊन आम्हाला अशी प्रगती नको,” असे जयंत पाटील म्हणाले.

शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यायी मार्ग, विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण यांसारखे पर्याय उपलब्ध असताना शेतकऱ्यांच्या शेतातूनच रस्ता काढण्याचा आग्रह का धरला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. रस्त्याची लांबी वाढवून सार्वजनिक पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘देवांना जोडण्याऐवजी मतदारसंघ जोडण्याची स्पर्धा’

शक्तीपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघातून जावा यासाठी काही लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा आरोप करत जयंत पाटील यांनी “देवांना जोडण्याऐवजी नेत्यांच्या जमिनी आणि मतदारसंघ जोडण्याचा प्रयत्न होत आहे,” अशी टीका केली.शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये विरोध होत असून यापूर्वी कोल्हापूर, पंढरपूरसह विविध ठिकाणी आंदोलने झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मोर्चातून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार’

२१ ऑगस्टच्या मोर्चाबाबत जयंत पाटील म्हणाले, “जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. शक्तीपीठसारख्या रस्त्याची आम्हाला गरज नाही, असे शेतकरी आणि जनता सांगत आहे. प्रचंड खर्च करून आधीच चांगल्या दळणवळणाच्या सुविधा असलेल्या भागात नवीन महामार्ग करण्याची आवश्यकता नाही.”

कर्जबाजारी आंबा बागायतदारांसाठी राजू शेट्टी सरसावले; नवी मुंबईतील बैठकीत घेतला मोठा निर्णय

बी. जी. पाटील यांनी आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले. “जमीन शिल्लक राहिली तरच युवकांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गामुळे सुमारे ३ हजार ५२ एकर जमीन बाधित होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

‘पाचपट मोबदल्याचे आश्वासन, प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा भ्रमनिरास’

शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन करताना पाचपट मोबदला मिळणार असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात रेडीरेकनरच्या दरानुसार मोबदला निश्चित केला जात असल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. शासनाने शेतकऱ्यांशी पुरेशी चर्चा न करता प्रकल्प पुढे रेटू नये, अशी मागणी करण्यात आली.

‘रात्रीची जमीन मोजणी कशासाठी?’

शक्तीपीठ महामार्गासाठी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी जमीन मोजणी केली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. “सरकारने आपली जबाबदारी टाळू नये. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

‘महामार्गापेक्षा शेतकऱ्यांची जमीन महत्त्वाची’

“कृष्णा, वारणा आणि अन्य नद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी इंच न इंच जमीन सुपीक केली आहे. अनेकांनी कर्ज काढून जमीन सिंचनाखाली आणली. ही जमीन एखाद्या प्रकल्पासाठी गमावली तर पुढच्या पिढीसमोर मोठे संकट उभे राहील.” जयंत पाटील

Web Title: Shaktipeeth highway protest sangli raju shetti jayant patil marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • raju shetty
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
1

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Raju Shetty Satara Politics: सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शेतकरी पेटले; राजू शेट्टींच्या नेतृत्वात लाँगमार्चची घोषणा
2

Raju Shetty Satara Politics: सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सातारा जिल्ह्यात शेतकरी पेटले; राजू शेट्टींच्या नेतृत्वात लाँगमार्चची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.