Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By-Election: जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?

बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली असून मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “८५ ते ९० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, अशी अपेक्षा आहे

  • By anuradha sagar
Updated On: Apr 23, 2026 | 11:51 AM
Jay Pawar Baramati, Sunetra Pawar Bypoll, Baramati Assembly Election 2029,

Jay Pawar Baramati, Sunetra Pawar Bypoll, Baramati Assembly Election 2029,

Follow Us
Follow Us:
  •  बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
  • २०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी-  जय पवार
  • यावेळी ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत मतदान होईल- जय पवार
Baramati Assembly bypoll Election 2026: बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सुनेत्रा पवार या रिंगणात असल्या तरी भविष्यात या मतदारसंघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः २०२९ च्या निवडणुकीत Jay Pawar हे उमेदवार असतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आज (गुरुवार, ता. २३) मतदानासाठी सुनेत्रा पवार यांच्यासोबत आलेल्या जय पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २०२९ च्या संभाव्य उमेदवारीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना जय पवार म्हणाले, “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, मला सध्या कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे.”

जय पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांनी सध्या तरी उमेदवारीबाबत थेट दावा टाळल्याचे स्पष्ट झाले असले, तरी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Baramati Byelection 2026: शरद पवार बारामतीत का येऊ शकले नाहीत?

काय म्हणाले जय पवार

पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “२०२९ मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणूनच काम सुरू ठेवायचे आहे आणि सर्वांना मदत करायची आहे, अशी माझी इच्छा आहे. ” उमेदवारीपेक्षा कार्यकर्ता म्हणून काम करण्यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

“दादा आणि वहिनींवर प्रेम ठेवा” – जय पवार यांचे आवाहन

दरम्यान, बारामतीतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केले. “यावेळेस जसं अनेक वर्ष ‘दादां’वर प्रेम केलं, तसंच दादांवर आणि वहिनींवरही प्रेम करा. वहिनी भरघोस मतांनी निवडून येतील, ही आमची आशा आहे,” असे ते म्हणाले.

By Election : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; 4 मे ला निकाल होणार जाहीर

बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली असून मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “८५ ते ९० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, अशी अपेक्षा आहे. काल मी सर्व पोलिंग एजंटशी संवाद साधला असून त्यांनीही चांगल्या प्रतिसादाची माहिती दिली,” असे जय पवार यांनी सांगितले.

निकालाबाबत संयमाची भूमिका

विजयाचा फरक किती असेल, याबाबत विचारले असता त्यांनी संयमाने उत्तर दिले. “रेकॉर्डब्रेक मतांनी विजय होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र किती मतांनी निवडून येतील, याबाबत आत्ता काही सांगता येणार नाही. आपण ४ तारखेला निकाल पाहू,” असे ते म्हणाले.

 

Web Title: Jay pawar as candidate for 2029 elections emerging political buzz during baramati bypolls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Baramati Assembly bypoll Elections 2026
  • Jay Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
1

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन
2

हिंजवडीच्या वाहतूक कोंडीला कायमचा पूर्णविराम! ‘पीएमआरडीए’चा 2182 कोटींचा मास्टर प्लॅन

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
3

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.