Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed News : बीडमध्ये दुष्काळाचे संकट गडद; २२५ टँकर्स सुरू, सुनेत्रा पवारांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Beed News : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असून पिण्याचे पाणी, पीक नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा बैठक घेऊन २२५ टँकर्सच्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण, पंचनामे आणि जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 09:32 PM
Beed Drought sunetra pawar

Beed Drought sunetra pawar

Follow Us
Follow Us:
  • बीडमधील दुष्काळी परिस्थितीचा सुनेत्रा पवारांकडून आढावा
  • पीक नुकसान पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
  • पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरण्यास मनाई
 

Beed News : पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार, 17 ऑकटोबर) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

या बैठकीस आमदार प्रकाश सोळुंके, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे आणि जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना

सध्या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक करपले असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. बहुतांश पंचनामे पूर्ण होत आले असून अहवाल प्राप्त होताच नियमानुसार पुढील कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पीक विमा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे निर्देश संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

यावेळी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळ आणि टंचाईच्या काळात नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा, लग्न आणि वाढदिवसांवरील खर्च टाळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, असे आवाहन केले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या टँकर्सवर जीपीएस (GPS) प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्यायोग्य पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी करू नये आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय जलस्रोतांचे पुनर्भरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी जलसंवर्धनाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केल्या.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पूर्वनियोजन करावे आणि शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स तसेच अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे, असे बैठकीत सांगण्यात आले. वीबी-जी रामजी योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे जलसंवर्धनाशी जोडून प्रभावीपणे राबवावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येणार नाही.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. पाणी, चारा आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींवर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असेही आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. वाढत्या दुष्काळी संकटात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविल्या जात आहेत

शेतकरी बांधवांना या नैसर्गिक संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना तातडीने सावरण्यासाठी राज्य शासन सर्व स्तरांवर उपाययोजना करत असून प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यानी यावेळी सांगितले.

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीड जिल्ह्यात सध्या किती टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे?

    Ans: बीड जिल्ह्यात सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

  • Que: दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजना सुचवण्यात आल्या?

    Ans: पीक नुकसान पंचनामे तातडीने पूर्ण करणे, पीक विमा प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, जनावरांच्या चाऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आणि जलसंधारणाची कामे हाती घेणे यावर भर देण्यात आला.

  • Que: जनावरांच्या चाऱ्यासाठी कोणते पर्याय सुचवण्यात आले?

    Ans: शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स आणि अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Beed news drought review sunetra pawar 225 water tankers vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • Beed News
  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र
1

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ
2

Rohit Pawar : ‘सुनेत्रा पवारांना अर्थमंत्रिपद मिळणार नाही’, रोहित पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’
3

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा हाहाकार! पाच दुष्काळ पाहिलेल्या ९५ वर्षीय वृद्धाची हृदयद्रावक हाक; ‘अशी परिस्थिती कधी…’

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती
4

Wardha News : दुष्काळ निवारणासाठी ‘जलतारा’ देणार बळ, प्रशासन सज्ज; साडे आठ लाख मनुष्यदिनची रोजगार निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.