हे सगळं कुणीतरी रचतंय! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर जयंत पाटलांना वेगळाच संशय
इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आमदार जयंत पाटील गुरुवारी (दि. २४) ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रॅली काढून अर्ज दाखल केला जाणार आहे. तब्बल १ लाखांच्या मताधिक्याने जयंत पाटील यांना विजयी करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बाेलून दाखविला.
गुरुवारी सकाळी १० वाजता वाळवा पंचायत समितीपासून रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून गांधी चौकात येईल. येथे रॅलीचे सभेत रूपांतर केले जाईल. यानंतर आमदार पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील. या दिवशी इस्लामपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुका व मिरज तालुक्यातील ८ गावातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहतील, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले. आघाडीतील मित्र पक्षांसह आम्ही एकदिलाने ही निवडणूक लढवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमणभाऊ डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, पै. भगवान पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, संजय पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, धैर्यशिल पाटील, विश्वनाथ डांगे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, सुरेंद्र पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.
विजय पाटील म्हणाले, राज्यातील जनता महागाई व भ्रष्टाचाराने त्रस्त असून शेती मालास भाव नाही, मुलांच्या हाताला रोजगार नाही, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा व सुव्यस्था ढासळली आहे. त्यामुळे राज्यात बदल होणार आहे. – विजय पाटील, तालुकाध्यक्ष