Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

जेजुरीत भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवा निर्धार मेळाव्या’त हजारो युवा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी युवकांना संघटनेत व्यासपीठ देण्यासोबतच सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 09:29 PM
bjp yuva gopichand padalkar

bjp yuva gopichand padalkar

Follow Us
Follow Us:
  • जेजुरीत भाजप युवा मोर्चाचा ‘युवा निर्धार मेळावा’
  • हजारो युवा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
  • ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’; गोपीचंद पडळकरांचे आवाहन
 

जेजुरी : भारतीय जनता पक्षाची ताकद ही घराणेशाहीत नसून सामान्य कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाला संधी देणाऱ्या संघटनात्मक विचारधारेत आहे. गावागाड्यातील, उपेक्षित व वंचित घटकांतील होतकरू तरुणांना संघटनेत व्यासपीठ देऊन त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारावी. शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्याचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रियपणे काम करा, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे ग्रामीणच्या वतीने जेजुरी येथे आयोजित ‘युवा निर्धार मेळाव्या’त ते बोलत होते. या मेळाव्यास हजारो युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. युवा प्रश्न, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास, शासकीय योजना आणि संघटनात्मक विस्तार या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

पडळकर म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही घराणेशाहीवर नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी संघटना आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची संधी भाजपमध्ये मिळते.” बिहारमधील सामान्य कार्यकर्ता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचतो, तर पडळकरवाडीसारख्या छोट्या गावातील सामान्य कुटुंबातील तरुण विधिमंडळात पोहोचतो, हे कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला संधी देणाऱ्या भाजपच्या विचाराचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

“युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी आहे. गावागाड्यातील तरुणांशी संपर्क वाढवा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. संघटनेत नव्या आणि होतकरू तरुणांना संधी देत त्यांना नेतृत्वासाठी तयार करा,” असे पडळकर यांनी सांगितले.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव. सोलनकर सोलनकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. “तरुणांच्या प्रश्नांना योग्य दिशा देण्याऐवजी तरुणांची माथी भडकवण्याचे काम केले जात आहे. युवकांना भडकावण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार, शिक्षण आणि कौशल्याची ताकद देण्याची गरज आहे,” असा आरोप सोलणकर यांनी केला.

भाजप पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी भाजपच्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या पक्षाच्या प्रवासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांनी युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर भर दिला. यावेळी युवाशक्तीच्या माध्यमातून संघटन विस्तार, युवकांच्या प्रश्नांवर काम आणि गावपातळीवर संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.

या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक, भाजप पुणे ग्रामीणचे प्रभारी सदाशिव खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, भाजप पुणे जिल्हा दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलणकर, भाजप सरचिटणीस बाळासाहेब गरुड, वैशाली सणस, अविनाश मोठे, पांडुरंग कचरे, भाजप नेते खलिल काजी, गोविंद देवकाते, युवा मोर्चा महामंत्री स्वप्नील मोडक, अमर बुदगुडे, विवेक साळुंके, ओंकार कड्डे, मयूर शिंदे, अनिकेत भालेराव, युवती अध्यक्ष रसिका सणस, संदीप केसकर, शुभम रणवरे यांच्यासह भाजप व युवा मोर्चाचे विविध पदाधिकारी, मंडल पदाधिकारी आणि हजारो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

Web Title: Jejuri bjp yuva morcha shakti pradarshan gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • BJP
  • gopichand padalkar
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
1

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
2

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.