Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा ‘तो’ प्रस्ताव नामंजूर

आमदार सचिन अहिर यांनी या मिळकती तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा आणि त्यानंतर विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. काही व्यापारी ट्रस्टच्या आडून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2025 | 02:56 PM
महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा 'तो' प्रस्ताव नामंजूर

महसूलमंत्री बावनकुळे यांचा जागा हडप करणाऱ्या लॉबीला दणका; नूतनीकरणाचा 'तो' प्रस्ताव नामंजूर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : माझगाव येथील जीजीभॉय ट्रस्टचा शासकीय भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला. तसेच, ट्रस्ट किंवा विकसकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.

आमदार सचिन अहिर, आमदार अमोल मिटकरी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई शहर जिल्हाधिकारी, आंचल गोयल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. माझगाव महसूल विभागातील भुकर क्रमांक ३६५ या मिळकतींचा भाडेपट्टा जे. पी. एम. जीजाभॉय ट्रस्ट यांच्याकडे होता. ट्रस्टने नूतनीकरणाची रक्कम भरण्यास विलंब केला होता. त्यानंतर, नूतनीकरणाची रक्कम ऐक्य रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून अनावधानाने शासनखाती भरणा करण्यात आली होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

दरम्यान, आमदार सचिन अहिर यांनी या मिळकती तातडीने शासनाच्या ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करावा आणि त्यानंतर विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. काही व्यापारी ट्रस्टच्या आडून शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला तातडीने मज्जाव झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

…तर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेणार

याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जमीनीचा भाडेपट्टा नूतनीकरण करु नये, तसेच भरलेली रक्कम तात्काळ परत करावी, तसेच जर ट्रस्टने नवीन अर्ज केल्यास शासन त्याबाबत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

राज्यात E-Bond सुविधा सुरू

राज्य सरकारने प्रशासनाला डिजिटल स्वरूप देण्यासाठी एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शुक्रवारी घोषणा केली की, इलेक्ट्रॉनिक बाँड्स (ई-बॉन्ड्स), ई-स्टॅम्पिंग, ई-सिग्नेचर आणि ऑनलाइन पेमेंटची सुविधा आता संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे. ही सुविधा लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील १७ वे राज्य बनले आहे.

Web Title: Jijibhoy trust lease renewal proposal canceled decision of revenue minister chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • Maharashtra Politics
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार? मनसे नेत्याच्या ‘या’ विधानाने चर्चेला उधाण
1

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे बंधू एकत्रित लढणार? मनसे नेत्याच्या ‘या’ विधानाने चर्चेला उधाण

Vande Mataram: वंदे मातरम् वरुन पेटला वाद!अबू आझमींवर भाजप नेते भडकले; म्हणाले, पाकिस्तानात चालते व्हा…’
2

Vande Mataram: वंदे मातरम् वरुन पेटला वाद!अबू आझमींवर भाजप नेते भडकले; म्हणाले, पाकिस्तानात चालते व्हा…’

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT विनाच; निवडणूक आयोगाने म्हटले…
3

मोठी बातमी ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT विनाच; निवडणूक आयोगाने म्हटले…

Maharashtra Politics: “कडूंना साताबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर…; संजय राऊतांनी केली भूमिका स्पष्ट
4

Maharashtra Politics: “कडूंना साताबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर…; संजय राऊतांनी केली भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.