Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Avhad : महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या…; रमी जुगारप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

रमी जुगारप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुगारप्रकरणावर नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड जाणून घ्या, सविस्तर

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 20, 2025 | 05:35 PM
Jitendra Avhad : महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या…; रमी जुगारप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे:  रमी जुगारप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  जोरदार हल्लाबोल चढवला आहे.आव्हाड म्हणाले की, विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. पण, सध्या जे घडतंय ते पाहता  लोकशाहीचे पावित्र्य नष्ट करण्याचा ठेका प्रत्येकाने घेतला आहे असं वाटते. एक आमदार ५ गुंड घेऊन येतो मारामारी करतो. मारहाण करणारे पाच जण असतात. गुन्हा एकावरच दाखल केला जातो. मार खाणाराच गुन्हेगार ठरविला जातो. आता तर पिकांची हमी मागणार्यांना रमी दाखविली जाते. ज्या रमी जुगाराने तरुणांनी आत्महत्या केल्या. तोच जुगार सभागृहात खेळला जात आहे. या महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावलेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली.  एक्स हँडलवरून ट्विट करत कोकाटे यांचा आव्हाडांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला त्यांनी लगावला कोकाटेंना लगावला.

आव्हाड पुढे असंही म्हणाले की, विधिमंडळाचे पावित्र्य न राखण्याचा विडाच सत्ताधार्यांनी आखला आहे. सत्ताधारी पक्षातील एक आमदार शरद पवार , उद्धव ठाकरे , जयंत पाटील यांच्यावर अत्यन्त खालच्या पातळीवर टीका करतो. बाळासाहेब ठाकरे याना सूर्याजी पिसाळ म्हणतो. तरीही त्यांचे वरिष्ठ त्याला रोखत नाहीत. त्यामुळेच हा आमदार गुंड घेऊन विधिमंडळात मारामारी करायला येऊ शकतो. त्यावेळी जर मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडले असते. त्यावेळी मकोका, दरोड्यातील पाच गुंड होते. त्यांची नावेही दिली आहेत. मात्र गुन्हा फक्त एकावरच दाखल करण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी… pic.twitter.com/GSzJHqYqP7

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2025

Kalyan News : APMC मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची वेळ ; प्रशासकाच्या मनमानी कारभाराविरोधात संचालकांचा संताप

माझे विधानसभाध्यक्षांना आवाहन आहे की, मार खाणाऱ्याला अटक केली तशीच अटक मारणाऱ्या इतर चार गुंडाना आणि त्या गुंडाना इशारा करणाऱ्यावर कारवाई का नाही करीत ? म्हणूनच मी सभागृहात खेद व्यक्त केला नाही. मला वाईट वाटले हे मी सांगितले; माझी चूक असेल तर मी गेट वे ऑफ इंडिया समोर राज्याची माफी मागायला तयार आहे. मात्र, न केलेल्या चुकीची माफी मागणार नाही. नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे. त्यासाठी मी आणि रोहित पवार रस्त्यावर भूमिका घेऊन उतरलो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला तीन तास इथून -तिथे नाचवले, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्या जुगाराच्या प्रकरणावर राजीनामा घ्यायला हवा होता. पण, तो घेतला जात नाही. ज्या ऑनलाईन रमीमुळे तरुणांनी आत्महत्या केली. त्या रमीचा डाव मांडला जात आहे. असा डाव मांडणारे धन्य आहेत, असेही आव्हाड म्हणाले.

‘कृषीमंत्री जुगाराचं पिक पेरण्यात व्यस्त, मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्याला…’, मनसेचा कोकाटेंवर हल्लाबोल

Web Title: Jitendra awhads scathing criticism of the rummy gambling case which has turned maharashtra into a gambling den

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Marathi News
  • Nationalist Congress Party
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News : महानगरपालिकेच्या आश्वासनाचे तीन तेरा; नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं
1

Thane News : महानगरपालिकेच्या आश्वासनाचे तीन तेरा; नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ‘आपला दवाखाना’ला टाळं

Navi Mumbai :  घरांच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बैठक; दैनिक नवराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश
2

Navi Mumbai : घरांच्या घोटाळ्याच्या आरोपांबाबत बैठक; दैनिक नवराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
3

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात
4

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.