Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

पावसाच्या विलंबाचा फटका अल्पमुदतीच्या मूग आणि उडदाला बसला. ३५ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ हजार ७८९ हेक्टरवर (१७ टक्के) मुगाची पेरणी झाली, तर ३१ हजार ३२७हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६ हजार ३५६ हेक्टरवर (२० टक्के) उडदाची लागवड झाली.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2026 | 11:30 AM
ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

Follow Us
Follow Us:

अमरावती विभागातील यंदाच्या खरीप हंगामाने शेतीतील बदलत्या पीकपद्धतीचे स्पष्ट चित्र समोर आणले. रोख उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन आणि कापूस पिकांनी विभागातील बहुतांश क्षेत्र व्यापले असून, पारंपरिक ज्वारी-बाजरीची लागवड ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मका पिकाने अपेक्षेपेक्षा मोठी झेप घेत सरासरी क्षेत्राच्या तब्बल १५१ टक्के क्षेत्रावर पेरणी नोंदविली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतीचा कल अन्नधान्य पिकांकडून नगदी आणि बाजारपेठाभिमुख पिकांकडे अधिक वेगाने वळत असल्याचे स्पष्ट झाले.(फोटो सौजन्य – istock)

Amravati New: आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर! वसतिगृहांची अवस्था बिकट; विविध मुलभूत सुविधांपासून वंचित

अमरावती विभागात सोयाबीनचे वर्चस्व यंदाही कायम राहिले असून, १४.६३ लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १३.४२ लाख हेक्टरवर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ४.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून तेथे सरासरीच्या ११२ टक्के क्षेत्रावर पेरा झाला. दुसरीकडे, कापूस पिकानेही आपली मजबूत पकड कायम ठेवत १०.९२ लाख हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १०.८० लाख हेक्टरवर (९९ टक्के) पेरणी गाठली. यवतमाळमध्ये ४.८७ लाख हेक्टर (१०३ टक्के) आणि अमरावती जिल्ह्यात २.६७ लाख हेक्टर (१०० टक्के) क्षेत्रावर कापूस लागवड पूर्ण झाली. मात्र, या चित्राची दुसरी बाजू चिंताजनक आहे.

एकेकाळी पश्चिम विदर्भाच्या अन्नसाखळीचा आधार असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले. २९ हजार ८५६ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी अवघ्या २ हजार ८३५ हेक्टरवर म्हणजे केवळ ९ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. बाजरीची स्थिती तर आणखी गंभीर असून, ५३७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी केवळ १० हेक्टरवरच पेरणी झाली. त्यामुळे पारंपरिक तृणधान्ये शेतीतून हळूहळू हद्दपार होत असल्याची चर्चा कृषी क्षेत्रात सुरू झाली. याउलट, मक्याने यंदा विक्रमी वाढ नोंदविली. ४५ हजार ४६२ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत तब्बल ६८ हजार ६५२ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून हे प्रमाण १५१ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

शेती अधिकाधिक नगदी पिकांवरच अवलंबून

विभागातील ४.४९ लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४.२९ लाख हेक्टरवर (९६ टक्के) तुरीची लागवड झाली. तसेच कापूस आणि सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीला शेतकऱ्यांची पसंती कायम आहे. मात्र, पावसाच्या विलंबाचा फटका अल्पमुदतीच्या मूग आणि उडदाला बसला. ३५ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ हजार ७८९ हेक्टरवर (१७ टक्के) मुगाची पेरणी झाली, तर ३१ हजार ३२७हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६ हजार ३५६ हेक्टरवर (२० टक्के) उडदाची लागवड झाली. एकूणच, यंदाच्या पेरणीच्या आकडेवारीतून अमरावती विभागातील शेती नगदी पिकांवर अवलंबून होत असल्याचे स्पष्ट झाले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावतीत कोणत्या पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे?

    Ans: अमरावतीत सोयाबीन आणि कापूस या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे. तसेच मक्याची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

  • Que: मक्याची पेरणी किती टक्क्यांनी झाली आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत मक्याची १५१ टक्के पेरणी झाली आहे.

  • Que: ज्वारी-बाजरीच्या पिकांच्या क्षेत्रात घट का होत आहे?

    Ans: शेतकऱ्यांकडून बाजारपेठेतील मागणी, उत्पादनाची अपेक्षित मिळकत, पाण्याची उपलब्धता आणि पीक व्यवस्थापन यांसारख्या विविध कारणांमुळे पिकांच्या निवडीत बदल होऊ शकतो.

Web Title: Jowar and bajra lose ground in amravati soybean cotton acreage rises as maize sowing reaches 151 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Agriculrture News
  • Amaravati
  • farmer

संबंधित बातम्या

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून
1

PM Kisan Yojana: 24 व्या हफ्त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम पूर्ण, अन्यथा सरकार 6000 रक्कम ठेवेल रोखून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.