Photo Credit- Social Media
मुंबई : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि गदोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशासाठी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी राज्यपाल भवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी अध्यक्षांना शपथ देतील. कालिदास कोळंबकर राजभवनात जाऊन शपथ घेतली.
हंगामी अध्यक्षांनी शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय म्हणजेच 7 ते 9 डिसेंबर या काळात विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान, हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कालीदास कोळंबकर म्हणाले, पक्षाकडून मला हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मला शपथ घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसार आज दुपारी मी शपथ घेईल. विधानसभा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्याची इच्छा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. पण त्याबाबत काय निर्णय घ्यायचा, हे पक्षाकडूनच ठरवले जाईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेतन मिळणार माहितीये का? ‘हा’ आकडा एकदा पाहाच…
7 डिसेंबरपासून मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांचीही निवड केली जाईल. त्यानंतर 7 आणि 8 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील, 9 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर तर, नागपुरात 16 ते 21 डिसेंबर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होईल.
अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी 10 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होतील. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक अधिवेशने गाजवली होती. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी अनेक सत्ताधाऱ्यांनाही सडेतोड उत्तरे दिली. महायुतीने निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा निर्णय घेणार असल्याचा आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महायुती सरकार ही आश्वासने पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चमत्कारच म्हणावा! 16 हजार किलोची बस तरुणाच्या अंगावर चढली तरीही त्याला साधं
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले की, 15 व्या विधानसभेचे नवनिर्वाचित 288 सदस्य 7 आणि 8 डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्याचदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार आहे.
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीला भेट देणार आहोत. राज्य सरकारने 6 डिसेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये शुक्रवारी बंद राहणार आहेत. तसेच दारूची दुकाने बंद राहणार आहेत.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; इमारती हादरल्या, सुनामीचा