Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरोदर महिलेची प्रसूती करण्यास केडीएमसीच्या रुग्णालयाने दिला नकार, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरचं प्रसूती

पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 10, 2023 | 11:31 AM
गरोदर महिलेची प्रसूती करण्यास केडीएमसीच्या रुग्णालयाने दिला नकार, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरचं प्रसूती
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-डोंबिवली : कल्याण स्कायवॉकवर गरोदर महिलेला बाळंतपणाच्या वेदना सुरु झाल्या. त्याची माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी हमालाच्या मदतीने तातडीने त्या महिलेला हातगाडीवर टाकून महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र रुग्णालयाने रुग्णालयात स्टाफ नसल्याचे कारण देत तिची प्रसूती करुन घेण्यास नकार दिला. पोलीस आणि हमालांनी विनंती करुन देखील रुग्णालयाने महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही. अखेर त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच झाली आहे. प्रूसत झालेल्या महिलेचे नाव राबिया साधू सिद असे आहे. तिला मुलगी झाली आहे. या घटनेवरुन रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. कोट्यावधी रुपये रुग्णालयावर खर्च केल जातात. त्याठिकाणी एका महिलेची प्रसूती करण्यास स्टाफ साधी तत्परता दाखवू शकत नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे.

राबिया सीद ही महिला गराेदर होती. तिला स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर प्रसूतीच्या वेदना सुरु होताच हा प्रकार नागरीकांनी पाहिला. तिची अवस्था पाहून नागरीकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉक गाठला. तिची अवघडलेली अवस्था पासून तातडीने तिला हातगाडीवर ठेवले. हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुक्णीबाई रुग्णालयात आणले. त्याठिकाणी रुग्णालयातील उपस्थितीत स्टाफने त्यांच्याकडे प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलीस विकास ठाकरे यांनी रुग्णालयाकडे विनंती केली. अहो महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती पश्चातही रुग्णालयाने घेतले नाही.

या महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या वसंत व्हली येथील प्रसूती गृहात घेऊन जा असे सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. पोलिसांनी आणि हमालांनी रुग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयातील स्टाफने साधी माणूसकी दाखविली नाही. महिलेची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाली आहे. प्रसूतीनंतर रुग्णालयाने तिला तिच्या नवजात मुलीसह एका लहान रुग्णवाहिकेतून वसंत व्ह’ली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले. दरम्यान घडलेल्या प्रकाराविषयी रुग्णालयात ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, आम्ही कुणाला बांधिल नाही. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय आम्ही कोणाला उत्तरे देणार नाही.

रुग्णालयात मनसे आणि ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

रुक्मीणीबाई रुग्णालयात गरोदर महिलेची प्रसूती करण्यास नकार दिल्याने त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाल्याचे कळताच मनसेचे पदाधिकारी उर्मिला तांबे आणि कपील पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात धाव घेतली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दत्ता खंडागळे, राजू दिक्षित हे देखील रुग्णालयात पोहचले. त्यांनी संतप्त होत स्टाफला जाब विचारला. त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केले. या घटनेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांच्या विरोधात जोपर्यंत कारवाई केली जात नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तो पर्यंत रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डा.पुरुषोत्तम टिके हे त्याठिकाणी पोहचले. त्यांनी मनसे आणि शिवसेनेचा रुद्रावतार पाहून त्याठिकाणी पोलिसांना पाचारण केले.

Web Title: Kalyan dombivli thane maharashtra kdmc hospital rabia said thane news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 11:31 AM

Topics:  

  • kalyan
  • KDMC hospital
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • thane
  • Thane News update

संबंधित बातम्या

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र
1

छोट्या प्रकल्पांसाठी MoFA, मोठ्या प्रकल्पांसाठी महारेरा; महाराष्ट्र सरकारने रिअल इस्टेटचे स्पष्ट केले चित्र

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
2

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात
3

Navi Mumbai Kalyan Connectivity: नवी मुंबई–कल्याण प्रवास लवकरच सुलभ; ऐरोली–कटाई उन्नत मार्ग अंतिम टप्प्यात

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
4

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.