Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivrajyabhishek Din 2026: कराडच्या संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती; ‘वारली’ चित्रकलेतून साकारला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा

कराडचे युवा कलाकार संदीप डाकवे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वारली चित्रकलेच्या माध्यमातून रायगडावरील ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचे सुंदर चित्र रेखाटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 05, 2026 | 07:38 PM
Shivrajyabhishek Din 2026: कराडच्या संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती; ‘वारली’ चित्रकलेतून साकारला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा
Follow Us
Follow Us:

 

  • कराडच्या संदीप डाकवे यांची अनोखी शिवभक्ती
  • ‘वारली’ चित्रकलेतून साकारला ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा
कराड/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण वारली चित्रकलेच्या माध्यमातून साकारत सैदापूर (ता. कराड) येथील युवा कलाकार संदीप डाकवे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला अनोखी कलात्मक भेट दिली आहे. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेशी नाळ जोडणाऱ्या वारली शैलीत त्यांनी रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षक चित्र रेखाटून शिवचरित्राविषयीची आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

ज्ञानेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या डाकवे यांनी कागदावर अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने ही कलाकृती साकारली आहे. पेन्सिलच्या साहाय्याने केलेल्या अचूक भौमितिक रचनांवर सूक्ष्म ब्रशवर्क करत त्यांनी सिंहासनारूढ शिवराय, राजदरबार, तुतारी व ढोल वाजवणारे मावळे तसेच राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार असलेले नागरिक यांचे चित्रण केले आहे. वारली कलेच्या साध्या पण प्रभावी रेषांमधून शिवकालीन वैभवाचे दर्शन घडविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या जनमानसात खोलवर रुजलेला आहे, तर वारली ही लोकजीवनातून जन्मलेली कला आहे. या दोन सांस्कृतिक घटकांची सांगड घालून शिवराज्याभिषेकाचा प्रसंग नव्या कलाभाषेत मांडण्याचा प्रयत्न केल्याचे डाकवे यांनी सांगितले.

अक्षय कुमारचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण लांबणीवर! ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ सिनेमाची शूटिंग थांबली?

संदीप डाकवे यांची ही पहिलीच ऐतिहासिक कलाकृती नसून यापूर्वीही त्यांनी वारली शैलीतून दत्तजयंती सोहळा, श्रीरामनवमी यांसारखे धार्मिक आणि सांस्कृतिक विषय साकारले आहेत. विशेष म्हणजे रक्ताचा वापर करून रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यापूर्वी राज्यभर चर्चेचा विषय ठरली असून त्या कलाकृतीचेही मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आहे.

शिवभक्ती आणि कलाविष्कार यांचा संगम साधत डाकवे यांनी विविध माध्यमांतून शिवरायांना मानवंदना दिली आहे. भिंतीवर साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळा, कवडीवर रेखाटलेली सिंहासनारूढ महाराजांची प्रतिमा, भाकरीवर साकारलेले शिवराय, तसेच मावळे आणि किल्ल्यांच्या नावांमधून उभी केलेली शिवरायांची प्रतिमा यांसारखे अभिनव प्रयोग त्यांनी यापूर्वी केले आहेत. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साकारलेल्या वारली चित्रकृतीमुळे त्यांच्या कलासाधनेला पुन्हा एकदा विशेष दाद मिळत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj History: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, इंग्रजी माध्यमातील नव्या पिढीने वाचायलाच हवा

Web Title: Karad artist sandeep dakwe creates shivrajyabhishek sohala in warli painting style

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Karad
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!
1

Satara News: संवादातून वाद मिटवणे ही न्यायदानाची सकारात्मक बाजू; सातारा लोकअदालतीत न्यायमूर्ती राजेश पाटील यांचे प्रतिपादन!

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा
2

Satara News: “एसटी नियमित सुरू करा अन्यथा.. “; वाई-आसरेच्या ग्रामस्थांचा एसटी महामंडळाला इशारा

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
3

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
4

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.