Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणी राज्य मार्गावरील करहर पूल वाहतुकीस खुला; पुलाची उंची, रुंदीही वाढवली

पाचवड-पाचगणी राज्य मार्गावरील करहर नजीक असलेला पुलासाठी जवळपास ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, या पुलाचे काम बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 12:26 PM
पाचगणी राज्य मार्गावरील करहर पूल वाहतुकीस खुला

पाचगणी राज्य मार्गावरील करहर पूल वाहतुकीस खुला

Follow Us
Follow Us:

मेढा : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जावळी तालुक्यातील पाचवड-पाचगणी राज्य मार्गावरील करहर नजीक असलेला पुलासाठी जवळपास ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, या पुलाचे काम बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुलाची उंची व रुंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास आता मदत होणार आहे.

पाचवड-पाचगणी राज्य मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते. पाचगणी, महाबळेश्वर पर्यटनस्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावरून दिवसेंदिवस वाहतूक वाढत चालली आहे. करहर नजीक मोठ्या ओढ्यावर असलेला पूल हा अरुंद व उंचीने कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवली जावी, अशी मागणी या विभागातील लोकप्रतिनिधी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या पुलासाठी निधी मंजूर केला होता.

पावसाळ्यात पूल वाहतूक आता सुरळीत

हातगेघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर या ओढ्याला महापूर येत असल्याने हा पूल पावसाळ्यात पाण्याखाली जात होता. वाहतुकीचा खोळंबा होत होता. हा पूल अरुंद असल्याने व दोन्ही बाजूंनी उतार असल्याने वाहतुकीस अडथळादेखील निर्माण होत होता. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची उंची १२ मीटरने वाढली असून रुंदी अडीच मीटरने वाढली असल्याने पावसाळ्यात हा पूल वाहतूक आता सुरळीत राहील.

असा आहे करहर नवीन पूल

पुलाचा निधी जवळपास ९९ लाख रुपये, पुलाची रुंदी उंचीअस्तित्वातील करहर पुलाच्या उंचीपेक्षा अडीच मीटरने उंची वाढविण्यात आलेली आहे. तसेच भविष्यातील वाहतुकीचा विचार करता सदर पुलाची रुंदी बारा मीटर करण्यात आली असून, सदर पुलाची लांबी ११.६६ मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील भरावा तीन ते चार मीटर उंच करण्यात आलेला असून, सदर ठिकाणी तयार होणारा चढ व उतार कमी करण्यात आलेला आहे.

“सध्या या पुलाचे काम पूर्ण झाले असून, या पुलाच्या दोन्ही बाजूस मुरूम भराव टाकून वाहतूक सुरू आहे. परंतु, पुलाच्या दोन्ही बाजूंना डांबरीकरण लवकरच केले जाणार आहे.”

– एस. एस. अटकेकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेढा

Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी

Web Title: Karhar bridge on the panchgani state highway open to traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Road Traffic
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.