पोशीर धरण कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार महेंद्र थोरवे
आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना आपल्या भूमिकेबद्दल आतापर्यंत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात होते. आपली भूमिका कायम असून जे कोणी बोलतात त्या बोलणारे यांच्या तोंडावर हात लावू शकत नाहीत.धरणाबद्दल माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना फेब्रुवारी महिन्यापासून पावसाळा येईपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. राजनाला परिसर ओलिताखाली आल्यानंतर तेथे उन्हाळ्यात दिसते.चिल्हार नदीवर जिल्हा परिषदेचे माध्यमातून बांधलेले सिमेंट बंधारे यांच्या खालून पाणी जायचे. त्यामुळे चिल्हार आणि पोश्री नदी कोरडी असते.
त्यामुळे आता शासनाने 2025 रोजी पोशीर धरण होणार असे जाहीर झाले. माझ्या जन्माच्या आधी धरणाचे काम होणार अशी चर्चा आहे.अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केले आहेत.श्रीराम पूल हे त्यातील उदाहरण असून जनतेने मला दुसऱ्यांदा निवडून दिले आहे.लहान लहान धरणे झाली पाहिजेत आणि त्यासाठी जामरंग, कोंढाणे साठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार थोरवे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले. २०११ मध्ये कोंढाणे चे काम सुरू केले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या काळात तेथे सिंचन घोटाळा झाला आणि पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे.
कोंढाणे धरण सिडको कडे वर्ग केले असून आपण कर्जत तालुक्याला पाण्याचा वाटा राखीव ठेवण्यावर आपण प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून केला.तर तेथील होणारे विस्थापित यांना बाहेर कुठेही न पाहता आदिवासी लोकांची घरे सिडको ने बांधावी अशी आपली भूमिका घेतली.
पाणीटंचाई साठी पाठिंबा होत. तालुक्यातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे या उद्देशाने आपण धरणाचे विषय आल्यावर त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पाणीटंचाई कायमची जावी यासाठी धरणाला पाठिंबा दिला. प्रांतिवमुंबई उपनगर येथे पाणी जाणार असेल तर माझा या मतदारसंघाचे आमदार म्हणून माझा तीव्र विरोध जाहीर केला.
राज्य सरकारने मला विचारले नाही,कोणतीही नोटीस दिलेली नाही आणि त्यामुळे माझा या धरणाला विरोध आहे. स्थानिकांनी धरणाला विरोध आहे ही भूमिका पुढे आल्यानंतर तेथे स्थानिकांचे विस्थापन होणार आहे ही बाब लक्षात घेऊन स्थलांतरित प्रश्न प्रलंबित आहे.असे होत असताना आपल्याला कोणतीही माहिती नाही त्यामुळे हे धरण होऊ दिले जाणार नाही अशीच माझी भूमिका आहे.स्थानिकांच्या सोबत उभे राहणार; स्थानिकांची ही भूमिका असून स्थानिकांची भूमिका धरणाच्या विरोधात तर तीच माझी भूमिका असणार आहे.
गावे कुठे शिफ्ट करणार यांचे घोषणा शासनाने घेतली नाही आणि त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करून धरण कायमस्वरुपी होऊ नये अशीच मागणी राहणार आहे.मागे तुम्ही मोर्चाने तहसीलदार यांना निवेदन दिले आणि त्यावेळी तुम्ही आमच्याकडे आले असते तर त्यावेळी विरोध आणखी तीव्र करू शकलो असतो अशी जाहीर भूमिका घेतली.यासाठी आपण मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्याकडे निदर्शनास आणून दिले जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले. माझी भूमिका दुटप्पी नसून पाणी प्रश्न गंभीर असल्याने माझी ती भूमिका होती,पण स्थानिक लोकांचे बरोबर मी असणार आहे असे शेवटी जाहीर केले.






