Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

Karjat News :  कर्जत तालुक्यातील माले गावात नीलिमा निलेश मोकल यांच्या गोठ्यात बांधलेले ‘लक्ष्मी’ नावाचे पांढऱ्या रंगाचे वासरू मध्यरात्री चोरीला गेल्याची घटना घडली. सकाळी वासरू गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर कळंब पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली असून नेरळ पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 04:12 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रात्री चारा देऊन झोपल्या, सकाळी गोठा केला तर वासरू गायब
  • दोरी सोडून वासरू नेल्याचा संशय; परिसरात शोधाशोध
  • कळंब पोलीस चौकीत तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू
Karjat News : कर्जत तालुक्यातील माले गावात शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधलेले वासरू रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. नीलिमा निलेश मोकल यांच्या गोठ्यातील पांढऱ्या रंगाचे ‘लक्ष्मी’ नावाचे वासरू अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कळंब पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून वासराचा शोध सुरू आहे.

रात्री चारा देऊन झोपल्या, सकाळी गोठा केला तर वासरू गायब

माले गावातील नीलिमा निलेश मोकल या स्वतः शेतीचा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात पांढऱ्या रंगाचे ‘लक्ष्मी’ नावाचे वासरू बांधले होते. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी वासराला चारा दिला आणि त्यानंतर त्या झोपण्यासाठी गेल्या. मात्र सकाळी सहा वाजता वासराला चारा देण्यासाठी गोठ्यात गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. गोठ्यात बांधलेले वासरू तेथे नव्हते.

जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय

दोरी सोडून वासरू नेल्याचा संशय; परिसरात शोधाशोध

गोठ्यात पाहणी केली असता वासरू बांधलेली दोरी सोडलेली आढळली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी गोठ्यातून वासरू पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. मोकल कुटुंबीयांनी तसेच परिसरातील नागरिकांनी वासराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच शोध घेऊनही ‘लक्ष्मी’चा ठावठिकाणा लागला नाही.

मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी

कळंब पोलीस चौकीत तक्रार; पोलिसांकडून तपास सुरू

वासरू सापडत नसल्याने अखेर मोकल यांनी कळंब येथील पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्टमधील पोलीस हवालदार महेश गोरे आणि काळोखे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वासरू चोरीला गेल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या असून, पोलिसांकडून वासराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Web Title: Karjat news calf stolen from a farmers house in male farmer lodges police complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Maharshtra news
  • Marathi News
  • Theft Case

संबंधित बातम्या

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
1

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
3

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू
4

Chandrapur News: चंद्रपूरवर दुष्काळाचे सावट; जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ‘ट्रिगर-१’ लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.