Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नव्या विकासकामामुळे रहिवाशांच्या घराला धोका; रेल्वे उड्डाण पुलाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे गेट असून ते बंद होणार असून या भागात उड्डाण पूल उभारला जाणार आहे.मात्र उड्डाण पुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 03:46 PM
Karjat News : नव्या विकासकामामुळे रहिवाशांच्या घराला धोका; रेल्वे उड्डाण पुलाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
Follow Us
Follow Us:
  •  नव्या विकासकामामुळे रहिवाशांच्या घराला धोका
  • रेल्वे उड्डाण पुलाच्या विरोधात शेतकरी आक्रमक
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील चिंचवली येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे गेट असून ते बंद होणार असून या भागात उड्डाण पूल उभारला जाणार आहे. मात्र उड्डाण पुलासाठी ज्या जमिनी रेल्वे घेणार आहे त्या जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.दरम्यान,या प्रस्तावित उड्डाण पुलामुळे चिंचवली आणि भानसोली गावातील अनेक घरांना देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी या उड्डाण पुलाला विरोध केला आहे.

कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळील चिंचवली येथील रेल्वे गेट क्रमांक 23 येथे रेल्वे गेट आहे. सध्या वाढलेली वाहने यामुळे त्या ठिकाणी असलेल्या फाटक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आणि मुंबई पुणे रेल्वे मार्ग रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी फाटक बंद करून त्यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात रेल्वेने नोटीस बजावली असली, तरी या प्रकल्पामुळे बाधित होणारे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

चिंचवली येथील या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणी साठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांना शासनाने जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. तसेच पुलाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे होणार आहेत. यामुळे जमिनीचे मूल्य कमी होऊन ती निरुपयोगी ठरणार आहे. अशा जमिनींचाही विचार करून योग्य दर द्यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे अत्यल्प जमीन शिल्लक राहणार आहे, ती संपूर्ण जमीन रेल्वेने ताब्यात घेऊन त्याचा योग्य मोबदला द्यावा या उड्डाण पुलामुळे केवळ शेतीच नाही, तर गावातील सामाजिक आणि धार्मिक बाबींवरही या पुलाचा परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या उड्डाण पुलामुळे गावातील अंत्यविधीसाठी जाताना ग्रामस्थांना 2-3 किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पर्यायी रस्ता किंवा भुयारी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली जात आहे.

Matheran News: ‘ग्राउंड रियालिटी’ तपासा; माथेरानमधील ९४ हातरिक्षा चालकांचे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित!

दरवर्षी होणारा गोविंदा उत्सव, गणपती विसर्जन आणि श्रीरामाची पालखी यांसारख्या धार्मिक सोहळ्यांच्या मिरवणुकीत या पुलामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील शाळा आणि मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासावर याचा परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व तांत्रिक आणि सामाजिक समस्यांचा सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती चिंचवलीकर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन संभाव्य बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे तहसीलदार यांना दिले आहे.

CIDCO News: सिडकोला मोठा धक्का; Bombay High Court निर्णयामुळे शेकडो कोटींचे नुकसान होणार?

Web Title: Karjat news new development threatens residents homes farmers aggressive against railway flyover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!
1

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप
2

Water Crisis : बार्डी गावात पाणीटंचाईचा उद्रेक; महिलांचा पंचायत समितीवर मोर्चा,ग्रामस्थांचा संताप

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
3

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
4

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.