Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : “आमच्या जमिनींवर धरण नकोच”, मागण्या ऐकल्या नाही तर…; संतप्त शेतकऱ्यांचा कार्यालयावर मोर्चा

धरणासाठी एकाही शेतकऱ्याने आपली जमीन देण्याची परवानगी दिली नाही आणि तरीदेखील शासनाने धरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झालेले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 05:16 PM
Karjat News : “आमच्या जमिनींवर धरण नकोच”,  मागण्या ऐकल्या नाही तर…;  संतप्त शेतकऱ्यांचा कार्यालयावर मोर्चा
Follow Us
Close
Follow Us:
  • आमच्या जमिनींवर धरण नकोच, संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा,
  • मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर होणार उपोषण
कर्जत/संतोष पेरणे :  राज्य सरकारने कर्जत तालुक्यात पोशीर आणि शिलार येथे धरण बांधण्याचे जाहीर केले आहे.या दोन्ही धरणासाठी एकाही शेतकऱ्याने आपली जमीन देण्याची परवानगी दिली नाही आणि तरीदेखील शासनाने धरणाचे काम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या विरुद्ध शिलार धरण परिसरातील शेतकरी आणि पोशीर धरण परिसरातील शेतकरी यांनी धरणाच्या विरोधात प्रचंड मोर्चा काढला. या दोन्ही धरणाच्या विरोधात शेतकरी कर्जत शहरात धडकले आणि कर्जत तहसील कार्यालयावर पोहचले.दरम्यान प्रांत अधिकारी यांनी सध्या धरण परिसरात सुरु असलेले काम थांबवण्यास असमर्थता दर्शवली असून शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेकबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे आता थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर उपोषण करणाऱ्यांचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बांधण्यात येत असलेल्या पोशीर धरणाला विरोध करण्यासाठी बोरगाव धरण विरोधी समितीच्या वतीने बोरगाव,उंबरखांड,भवानीपाडा,बोन्डेशेत,पेंढरी, चेवने  भोपळेवाडी, झुगरेवाडी, ऐनाचीवाडी, चाफेवाडी,खांडसपरिसर, चई,कोतवालवाडी,ओलमन,सुरुंग,तेलंगवाडी,गावंड वाडी येथीलस  हेटकाऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.समितीचे प्रमुख तानाजी चौधरी,सचिव भरत डोंगरे,तसेच अशोक पाटील,लक्ष्मण पोसाटे,राजेंद्र डोंगरे,ललित धस,प्रभाकर खडेकर,नंदू खडेकर ,नितीन पाटील,सुधीर शेळवले,समीर खडेकर,यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड कर्जत रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून हा मोर्चा कर्जत तहसील कार्यालयावर पोहचला.

शिलार धरण प्रकल्पग्रस्त समिती चे वतीने निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व भाजप मंडळ अध्यक्ष आणि बांधीत होणारे शेतकरी दिनेश रसाळ.तसेच काशिनाथ रसाळ,माधव मिणमिने,अशोक आसवले,वसंत रसाळ,राजेंद्र भगत,काशिनाथ निरगुडे,रामदास शिंगटे,संतोष कदम,वसंत केवारी यांच्या नेतृत्वाखाली निघाला.या मोर्चात शिलार धरणामुळे बाधित होतील अशा गावातील शेतकरी सहभागी झाले होते.त्यात धोत्रे ,धोत्रेवाडी,शिलार,किकवी. पिंगलस,खांदन,शिलारवाडी,आनंदवाडी,मोगरज,भक्ताची वाडी,आंबिवली,शिंगधोळ,धामणी,जांभूळवाडी,चौधरी वाडी आदी गाव आणि वाडीमधील शेतकरी सहभागी झाले होते.छत्रपती संभाजी महाराज चौक येथून निघालेला हा मोर्चा आमराई मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रशासकीय भवन येथे पोहचला.

प्रशासकीय भवन येथे मोर्चाचे वतीने प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तहसीलदार डॉ धनंजय जाधव,पोलीस अधिकारी कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमेश पाटील,नेरळ पोलीस थानायचे प्रभारी अधिकारी राहुल वारोटे आदी उपस्थित होते. तेथे शिलार आणि पोशीर धरणाला विरोध करणारे आणि मोर्चाला पाठिंबा देणारे विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांची निवेदने प्रांत अधिकारी यांनी स्वीकारली. पोशीर धरणाच्या वतीने प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष तानाजी चौधरी तर शिलार धरणाच्या वतीने दिनेश रसाळ यांनी आपला या धरणाला का विरोध आहे यांचे भूमिका मांडली.यावेळी प्रांत अधिकारी यांनी सर्व भूमिका समजून घेत पुढील आठवड्यात जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियानात यांच्यासोबत याच ठिकाणी दोन्ही धरणाच्या समिती सोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.

मोर्चाला पाठिंबा देणारे
शिवक्रांती संघटना,आगरी समाज संघटना,किसान क्रांती संघटनामकर्जत बचाव समिती,कर्जत वीज विरोधी समिती तसेच राजकीय पक्ष यात भाजप,शिवसेना ठाकरे गट,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,आरपीआय आठवले गट,मनसे

मागणी
शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी नसताना सुरु असलेले धरणाचे काम थांबवावे आणि आधी शासनाने पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात यावी अशी मागणी शिलार आणि पोशीर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांनी केलीय आहे.

इशारा
धरण बांधण्यासाठी शासन अशीच भूमिका घेणार असेल तर पुढील बैठकीनंतर शासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येईल. त्याचवेळी वेळ आली तरार राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

पोलिसांकडून पाणी
सध्याची उन्हाची स्थिती लक्षात घेऊन कर्जत आणि नेरळ पोलीस यांच्या माध्यमातून प्रशासकीय भवनाच्या बाहेर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.स्वतः पोलीस सर्व आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या वाटप करीत होते.

Web Title: Karjat news we dont want a dam on our lands if our demands are not heard angry farmers march to the office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Beed News :  अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य
1

Beed News : अजित दादांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करतोय; विजयसिंह पंडित यांचं वक्तव्य

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र
2

Astro Tips : यज्ञातील आहुतीसाठी चंदन-आंब्याचीच लाकडं का वापरतात ? जाणून घ्या प्राचीन परंपरेमागचं शास्त्र

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला
3

Aai Tuljabhavani Marathi Serial : आई तुळजाभवानीचा अलौकिक विवाह सोहळा ; अनोख्या केळवणाची उत्सुकता शिगेला

Ratnagiri :  चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी
4

Ratnagiri : चिपळूण शहरात एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नागरिकांनी केली गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.