Photo Credit- Social Media कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारली
बेळगाव: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगावातील वॅक्सिन डेपो मैदानात उद्या (10 डिसेंबर) महाराष्ट्र एकीकरण समितीचं महाअधिवेशन होणार आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास परवानगी नाकारली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो मैदानातसह आजुबाजूच्या परिसरात सकाळी सात वाजल्यापासून सांयकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय डेपो परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे.
कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारत मेळाव्याच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वॅक्सिन डेपो मैदानात तैनात करण्यात आला आहे. मराठी भाषिकांनी जमू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे मात्र मराठी भाषिकांनीदेखील मेळाव्याला जाणाऱ असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मेळावा घेण्याची भूमिका घेतल्याने परिसरात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
World’s Best Cities 2025: लंडन पुन्हा एकदा जगातील सर्वाेत्तम शहरांच्या यादीत पहिल्या
कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होतो. पण यावर्षी कर्नाटक सरकारने मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात येत आहे. कितीही संचारबंदी आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला तरी, वॅक्सिन डेपो मैदानात एकत्र जमणार असल्याचा इशारा मराठी भाषिकांनी दिला आहे. त्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानात येऊन पाहणीदेखील केल्याची माहिती आहे. पण उद्या होणाऱ्या या महामेळाव्याला परवानगी मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव सीमेवरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना अडवण्यात आले असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. बेळगावच्या सीमेवर मराठी माणसांना अडवण्यात आल्याची माहिती आहे. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला मराठी भाषिकांनी जाऊ नये म्हणून कर्नाटक सीमेवर कोनगोळी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनाही रोखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाचीही कसून तपासणी केली जात आहे.
Katrina-Vicky Anniversary: नशिबाने जुळवली रेशीमगाठ; विकी – कतरिनाची हटके