Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कावडी गाव ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’; ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!

जावळीतील कावडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात मारली बाजी! ५ कोटींच्या बक्षिसाचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विश्वास.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 09:23 PM
कावडी गाव ठरणार राज्यासाठी 'रोल मॉडेल'; ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!

कावडी गाव ठरणार राज्यासाठी 'रोल मॉडेल'; ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!

Follow Us
Follow Us:

 

  • कावडी गाव ठरणार राज्यासाठी ‘रोल मॉडेल’
  • ५ कोटींच्या बक्षिसाची नामदार शिवेंद्रसिंहराजेंना खात्री!
मेढा : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ हे महाराष्ट्रातील ग्रामपंचायती अधिक सक्षम करून ग्रामविकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. गावात राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा उद्देश सुशासन, स्वच्छ व हरित गाव आणि लोकाभिमुख सेवांद्वारे विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणे हाच आहे. जावळी सारख्या डोंगरी दुर्गम भागातील कावडी या गावाने या अभियानाअंतर्गत केलेला कायापालट हा निश्चित त्यांचे उदिष्ठ पुर्ण करण्यासाठी कामी येईल व राज्याचे पहिल्या क्रमांकाचे पाच कोटींचे बक्षिस कावडी गावाला मिळेल असा ठाम विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

कावडी ता.जावळी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कावडी ग्रामपंचायत विकास उत्सव आणि महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नामदार भोसले बोलत होते, यावेळी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सैा. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्य वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री गिरी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने, जावली बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, अभिनेत्री संजना काळे, अभिनेते संदीप पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना नामदार भोसले म्हणाले, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी कावडी गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला असून या अभियानांतर्गत गावात लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून मोठी चळवळ उभी केली आहे, ग्रामस्थांनी श्रमदानातून वसवलेल्या गावात केलेले अमुलाग्र बदल व केलेला विकास वाखाणण्याजोगा असून जिल्हायतील गावांनी आदर्श घेण्यासारखा आहे, भविष्यात तालुक्याचे रोल माँडेल म्हणून या गावाला नक्कीच पाहीले जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Satara News: सत्ता परिवर्तनाची चळवळ तळागाळात राबवली पाहिजे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा साताऱ्यात पवित्रा

ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे बोलताना म्हणाले, राज्यात एक नंबर बक्षिस आणण्यासाठी गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांनी स्वताचा बहुमोल वेळ देऊन श्रमदान केले आहे, अभियानाचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन वेळप्रसंगी लोकवर्गमी गोळा करून गावाचा कायापालट केला आहे, धरणामुळे गाव बाधीत झाल्यानंतर सपंर्ण गावाची नव्याने रचना करून डेंगरालगत गाव वसवले आहे, यासाठी ग्रामस्तांची मोठी जिद्द व मेहनत यासाठी आम्ही केली आहे त्याचे फळ या योजनेचे पहिले बक्षिस आम्हाला मिळाल्यानंतर नक्की मिळेलअसा विश्वास व्यक्त करून नामदार शिवेंद्रराजे यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचेही त्यांनी नमूदकेले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सैा.प्रिया शिंदे बोलताना म्हणाल्या, वसंतराव मानकुमरे यांनी सर्वांना एकत्रितघेऊन विकास संधीचे सोने या निमित्ताने केले आहे, एका छेटाशा गावात विकासाचा डोंगर उभा करत याअभियानाला साजेशे काम करून दाखवले आहे. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचा सिंहाचा वाटा असून भविष्यातजिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. लवकरच आरोग्यादायी सातारा जिल्हा निर्माण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी संपुर्ण गावाची पाहणी केली त्यानंतर गावातून त्यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामने यांनी उपस्तितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

Fire News : तासवडे MIDC हादरले! केमिकल कंपनीत भीषण स्फोटांची मालिका,कोट्यवधींचे नुकसान

Web Title: Kavadi village set to become a role model for the state minister shivendrasinharaje confident of a 5 crore prize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • gram panchayat
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.