Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वर मार्गावरील केळघर पूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला; प्रवास होणार सुकर

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रामजी बुवा पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून ७.०५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला होता. पुढील काही दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2026 | 01:29 PM
महाबळेश्वर मार्गावरील केळघर पूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला; प्रवास होणार सुकर

महाबळेश्वर मार्गावरील केळघर पूल लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला; प्रवास होणार सुकर

Follow Us
Follow Us:

मेढा : विटा ते महाबळेश्वर या राज्य मार्गावरील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या आंबेघर तर्फे मेढा येथील रामजीबुवा पुलाचे काम अंतिम टप्यात आले असून, येत्या काही दिवसात हा पूल प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आर. आर. कन्स्ट्रक्शनने हे काम दर्जेदार केले असून, पावसाआधी या पुलाचे काम मार्गी लागत असल्याने प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रामजी बुवा पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून ७.०५ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला होता. पुढील काही दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सातारा-मेढा महाबळेश्वर मार्गावरील आंबेघर येथे या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर होत आहे. वेण्णा नदीवर ‘आर्च’ पद्धतीने कोरीव दगड व चुन्याच्या मिश्रणातून बांधलेला सुमारे १५० वर्षांपेक्षा जुना पूल म्हणून या पुलाची ओळख होती. हा ऐतिहासिक पूल जीर्ण झाल्यामुळे जानेवारी महिन्यात पाडण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून अखेर या पुलाला नूतनीकरणामुळे झळाळी मिळाली आहे.

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या ! सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड काढून घ्याच; ‘या’ तारखेपासून कार्ड असेल बंधनकारक

केळघर घाट मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नवीन पुलाची रुंदी चारपदरी अशी रस्त्याला सुसंगत अशी झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. आंबेघर पुलाची उंची वाढल्याने अपघातांचे प्रमाणही कमी होणार आहे. या पुलाचे लोकार्पण लवकरच होणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

असा बांधण्यात आला आहे रामजी बुवा पूल…

वेण्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या पूलाला १५ मिटर लांबीचे ३ गाळे असून,एकूण ४५ मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा हा मोठा पूल आहे. मेढा व केळघर बाजूकडील पोहोच रस्ता संरक्षक भिंत देखील या पुलास असणार आहे.

ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Web Title: Kelghar bridge on the mahabaleshwar route will soon be opened for traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ‘देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा’ आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी; शासनाविरोधात घोषणाबाजी
1

Satara News : ‘देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा’ आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी; शासनाविरोधात घोषणाबाजी

कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा
2

कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा

Karad News: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा
3

Karad News: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं
4

Satara Politics: पक्षांतराचा प्रश्नच नाही…; अविनाश मोहितेंनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.