Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : खामगावचा ‘Green Pattern’ ठरतोय प्रेरणादायी; उद्यानांमुळे शहराला मिळाली नवी ओळख

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उभारण्यात आलेल्या १५ ते २० उद्यानांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. या उद्यानांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून सामाजिक संवादालाही चालना मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • हिरवाईमुळे पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.
  • उद्यानांमुळे चिमुकल्यांचे बालपण पुन्हा बहरले
  • खामगावचा ‘ग्रीन पॅटर्न’ इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात सध्या आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विविध भागांत उभारण्यात आलेल्या १५ ते २० छोट्या-मोठ्या उद्यानांमुळे खामगावकरांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. ही उद्याने केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालत नसून नागरिकांसाठी ऊर्जा, विरंगुळा आणि सामाजिक संवादाचे केंद्र ठरत आहेत.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा ‘कॉमन मॅन’ अवतार! ताफा सोडला, विशेष विमान नाकारले; फडणवीसांचा सामान्य प्रवाशांसोबत प्रवास

उद्यानांमुळे चिमुकल्यांचे बालपण पुन्हा बहरले असून, अभ्यासाच्या ताणातून वेळ काढत मुले संध्याकाळच्या वेळी झोपाळे, घसरगुंडी आणि हिरव्यागार मैदानांमध्ये मनमुराद खेळताना दिसतात. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

ही उद्याने केवळ मुलांसाठीच नव्हे, तर तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही ‘रिफ्रेशमेंट झोन’ ठरत आहेत. पहाटेच्या वेळी अनेक नागरिक येथे फिरणे, योगासने आणि व्यायाम करताना दिसतात. गजबजलेल्या शहरात शांततेचे काही क्षण अनुभवण्यासाठी ही ठिकाणे नागरिकांची पसंती बनत आहेत. मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षलागवडीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासाही मिळत आहे. हिरवाईमुळे पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.

Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक

नगर परिषद नागरिकांना उत्तम सुविधा देण्यावर भर देत आहे. ‘नाना-नानी पार्क’ आणि ‘नटराज गार्डन’ यांसारख्या उद्यानांची देखभाल कायम ठेवण्यासाठी नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी सांगितले. हे शुल्क उद्यानांची स्वच्छता, झाडांची निगा, पाणीपुरवठा आणि साधनसामग्रीच्या दुरुस्तीसाठी वापरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध वयोगटातील नागरिक एकत्र येत असल्याने या उद्यानांमुळे सामाजिक संवाद वाढण्यासही मदत होत असून, खामगावचा ‘ग्रीन पॅटर्न’ इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Khamgaons green pattern proves inspiring parks give the city a new identity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
1

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
2

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात
3

Buldhana News: एसटी बस-टिप्परच्या धडकेत १ ठार ६ जण जखमी; चिखली-खामगाव महामार्गावर घडला अपघात

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
4

नेपाळमध्ये अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा -वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.