Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खिलारी यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा; खडकीत मुक्तादेवी यात्रा उत्साहात साजरी

आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मुक्तादेवी यात्रा उत्सवनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भिमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2022 | 02:56 PM
खिलारी यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा; खडकीत मुक्तादेवी यात्रा उत्साहात साजरी
Follow Us
Close
Follow Us:

मंचर : आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मुक्तादेवी यात्रा उत्सवनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भिमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी दिली.

लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून प्रथमच खडकी येथे शर्यतीचा थरार रंगला. मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत तब्बल ८१५ बैलगाडा मालकांनी नोंदणी केली. ही यात्रा चार दिवस चालणार आहे. शर्यतीच्या पहिल्या दिवशी जिजाबा दगडू वाघमारे, सगाजी पाटील व सरपंच नारायण बांगर यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले.

अजिंक्य खांडेभराड यांचा बैलगाडा प्रथम

प्रथम क्रमांकात खेड येथील अजिंक्य सुधीर खांडेभराड यांचा बैलगाडा फळीफोड ठरला, द्वितीय क्रमांकात सावरगाव येथील शिवाजीराजे बबनराव चिकणे, तर तृतीय क्रमांकात गुंडाळवाडी येथील संतोष अनंता भोर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले. घाटाचा राजा हा किताब माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांच्या बैलगाड्याने पटकावला.

पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, माजी संचालक संजय बाणखेले, उद्योजक बाबाजी टेमगिरे यांनी यात्रेला भेट दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचे स्विय सहाय्यक भिवसेन भोर, भीमाशंकरचे संचालक दादाभाऊ पोखरकर, दत्ता हगवणे, बाळासाहेब पोखरकर, दत्ता भोर, यात्रा कमिटी अध्यक्ष विशाल वाबळे, अभिषेक वाबळे, माजी सरपंच अशोक भोर आदींनी यात्रेची व्यवस्था पाहिली. निशाणाची जबाबदारी बाबुराव शिंदे यांनी पार पाडली. ही यात्रा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करत शर्यत पार पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Web Title: Khilaris bullock cart became the king of ghat mukta devi yatra was celebrated with enthusiasm in khadki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 02:56 PM

Topics:  

  • Ambegaon
  • amol kolhe
  • Manchar
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.