Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kirit Somaiya On Love Jihad Law: किरीट सोमय्यांची राऊतांवर जहरी टीका; म्हणाले, “त्यांनी ठाकरेंसोबत हिरवा…”

राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 09:55 PM
'...ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार'; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

'...ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार'; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

मुंबई: राज्यामध्ये महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर सर्व नेते ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रमध्ये याबाबत कायदा आणला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील घेतली.  यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.14) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे. महायुती सरकारने यासंबंधीचा एक शासन निर्णय देखील जारी केला आहे. पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली तसेच सात सदस्यांची समिती देखील स्थापन केली आहे. मात्र विरोधक याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरुद्ध समिती स्थापन केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, “लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रात तरुणींचे शोषण केले जात आहे. त्यांची छळवणूक होत असल्याने असा कायदा आवश्यक आहे. ” दरम्यान लव्ह जिहादवर कायदा आणण्यासाठी समिती स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाने याचा विरोध केला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार

यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “संजय राउत यांचे धर्म परिवर्तन झाले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत हिरवा पोशाख घालण्यास सुरुवात केली आहे. मी घाटकोपरला गेलो होतो. आठ मशिदीवर लाऊडस्पीकर लागले होते. त्यापैकी कोणालाही त्याची परवानगी नव्हती. ”

#WATCH | Mumbai, Maharashtra | On Maharashtra government forming a committee against love jihad, BJP leader Kirit Somaiya says, "… This type of law is necessary to stop the ongoing bullying in Maharashtra because young girls are being exploited… Sanjay Raut has also been… pic.twitter.com/9mI6SrWTG0 — ANI (@ANI) February 15, 2025

यापूर्वी देखील महायुतीमधील नेत्यांनी लव्ह जिहाद’ विरोधात आवाज उठवला आहे. तसेच या संदर्भात कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे देखील सांगितले आहे. लव्ह जिहादबाबत राज्यामध्ये कायदा असल्याची गरज असल्याचे मत यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी व्यक्त केले होते.

हेही वाचा: महाकुंभमेळ्यामध्ये अजूनही 2 हजार नागरिक बेपत्ता? शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याने उडाली एक खळबळ

संजय राऊत काय म्हणाले?

खासदार संजय राऊत म्हणाले की,”हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही फसवणूक करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात. त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार. लव्ह जिहाद च्य नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का? लव्ह जिहाद झाला म्हणून,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला आहे.

Web Title: Kirit somaiya criticizes to sanjay raut and ubt about love jihad law mumbai maharashtra government news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • kirit somaiya
  • Love Jihad
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
1

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का?  ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज
2

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले;  ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 
3

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
4

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.