Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 01:53 PM
सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

Follow Us
Close
Follow Us:
  • सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका
  • बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली
  • दीर्घकाळ सत्ताधारी होण्यास रोखले
कोल्हापूर : सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने २०२१ मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळून लावली आहे. बँक्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती.

२०२१ साली रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करत सलग दहा वर्ष संचालक पद भूषवलेल्या व्यक्ती अगर लोकप्रतिनिधींना पुन्हा संचालक पदावर येता येणार नसल्याचं सांगितलं होतं. रिझर्व बँकेच्या या आदेशाला बँक असोसिएशनने आव्हान दिल्यानंतर याबाबतची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली. सर्किट बेंचने रिझर्व्ह बँकेचा आदेश अंतिम असल्याचं सांगत बँक्स असोसिएशनने केलेली याचिका फेटाळून लावली.

कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील महत्त्वाच्या सहकारी संस्थांमधील कारभारी संचालकांचे धाबे दणाणले आहेत. याबाबतची अंतिम सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाने जिल्ह्यातील संस्थाचा कारभार घरातून करणाऱ्या कारभाऱ्यांनाच चांगलाच हादरा बसला आहे.

दीर्घकाळ सत्ताधारी होण्यास रोखले

२०२१ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खासगी क्षेत्रातील बँकांसाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्ससंबंधी परिपत्रक जारी केले. यात संचालकांच्या मुदतीवर मर्यादा घालून दीर्घकाळ सत्ताधारी होण्यास रोखले गेले. प्रमोटर किंवा मोठे शेअरधारक हे एमडी, सीईओ किंवा संपूर्णवेळ संचालक म्हणून सामान्यतः १२ वर्षे (असाधारण प्रकरणात १५ वर्षांपर्यंत वाढवता येईल) पदावर राहू शकतात. २०२१ च्या नियमांनी सहकारी बँकांच्या नियमांना एकसारखे केले, ज्यात खासदार-आमदारांसारख्या निवडलेल्या नेत्यांना एमडी, डब्ल्यूटीडी पदांवरून दूर ठेवले आणि कार्यकारी मुदत एकूण १५ वर्षांपर्यंत मर्यादित केली.

जिल्हा बँकांमधील संचालकांना झटका

अनेक संस्थांवर आपलीच पकड असावी, यासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नेत्यांच्या घरात पदाची खिराफत गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील कारभारांना या निर्णयाने झटका बसला, तरी बॅकअप प्लॅन म्हणून घरातील मंडळींना पुढे करून सत्ता आपल्याच हातात ठेवण्यास कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, यात शंका नाही. न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या जिल्हा बँकांमधील शेकडो संचालकांना दणका बसणार आहे.

राजकीय निर्णयांणामुळे संस्था अडचणीत

गैर-कार्यकारी संचालकांसाठी आरबीआयने योग्यता तपासणी आणि बोर्ड नूतनीकरणावर भर दिला. ज्याने १० वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्यांना अप्रत्यक्षपणे दणका बसला. राजकीय व्यक्तींच्या सहकारी बँकांवरील नियंत्रणामुळे फसवणूक, खराब कर्जवाटप आणि पीएमसी बँकसारख्या पतन झाले, ज्यामुळे ठेवीदारांचा विश्वास कमी झाला होता. त्यामुळे आरबीआयने कठोर पावले उचलत नियमांची अंमलबजावणी केली होती.

Web Title: Kolhapur circuit bench has dismissed the petition challenging the reserve bank order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • maharashtra
  • Reserve Bank
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.