Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : प्रशासनाचा हलर्जीपणा,पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव; गावकऱ्यांचा संताप विकोपाला

इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदी पात्रात मिसळणाऱ्या दुषित पाणी थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी ओढ्यात घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 02:32 PM
Kolhapur News : प्रशासनाचा हलर्जीपणा,पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव; गावकऱ्यांचा संताप विकोपाला
Follow Us
Follow Us:
  • पंचगंगेत पुन्हा सांडपाण्याचा शिरकाव;
  • गावकऱ्यांचा संताप विकोपाला
कोल्हापूर : इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदी पात्रात मिसळणाऱ्या दुषित पाणी थांबवण्यासाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी शुक्रवारी ओढ्यात घातलेला बांध शनिवारी पाण्याच्या प्रवाहाने फुटला. त्यामुळे दुषित सांडपाणी पुन्हा नदीत मिसळू लागले आहे. दरम्यान, याबाबतची माहिती समजल्यानंतर आंदोलकांपैकी काहीजणांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीपात्रत मिसळणाऱ्या प्रदुषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील नदीकाठावरील गावांमध्ये असंतोष पसरला आहे.

पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला हे पाणी कायमस्वरुपी रोखण्यासाठी शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काळ्या ओढ्यात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मातीचा भराव व सिमेंटचे पाईप टाकत बांध घातला होता. बांध घातल्यानंतरही काळ्या ओढ्यातून पाण्याचा प्रवाह सुरुच राहिला होता. परिणामी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ओढ्यातील पाण्याचा तुंब आमराई रोडवरील ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरापर्यंत आला होता. मात्र साडेबारा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या दाबाने मातीचा भराव ढासळला आणि बांध फुटुन पाणी पुन्हा प्रवाहित झाले.

प्रदूषित पाणी बंद करण्यासाठी उपाययोजनांची गरज
ही माहिती समजताच टाकवडे, शिरढोणमधील नागरीक प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली. नदीत मिसळणारे प्रदुषित पाणी कसे बंद होईल यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले शुक्रवारी घातलेला बांध अधिक मजबुत करण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टरसह काही कार्यकर्ते आले होते. मात्र घातलेला बांध फुटल्याने पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत यंत्रसामुग्रीसह कार्यकर्ते थांबून होते.

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कोर्टाच्या आदेशानंतरही शासकीय यंत्रणा ढिम्मच
पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकासह प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कायमस्वरूपी कोणतीच उपाययोजना करत नाही, पंचगंगा नदीत थेट मैला मिश्रित पाणी सोडले जात असतानाही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नाही.
विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनाही याचे काहीच सोयर सुतक उरले नाही. टिम्म प्रशासनामुळे नदी काठच्या लाखो नागरिकांच्या जीवाशी का खेळले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. शिरोळ तालुक्यातील 11 गावच्या नागरिकांनी आंदोलन करून या काळ्या ओढ्यातील प्रदूषीत पाणी भराव टाकून आडविले होते.

Kolhapur News : ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

Web Title: Kolhapur news administrations negligence sewage enters panchgange again villagers anger escalates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • panchganga river

संबंधित बातम्या

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
1

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
2

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
3

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
4

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.