Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News: केंद्र सरकारचे बजेट म्हणजे शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी; राजू शेट्टींची टिका

सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विचार करूया. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा म्हणजे महिन्याला फक्त ५०० रुपये दिले जाणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 01, 2026 | 04:20 PM
Union Budget 2026, Union Budget 2026 Live updates, Union Budget 2026 live

Union Budget 2026, Union Budget 2026 Live updates, Union Budget 2026 live

Follow Us
Close
Follow Us:
  • अर्थसंकल्प म्हणजे ‘शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी ‘
  • अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी नसून शेतकऱ्यांच्या नावाने केलेली फसवणूक
  • कृषी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा सुमारे १५ टक्के
Kolhapur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे ‘शेतकऱ्यांच्या ताटात रिकामी थाळी ‘ ठेवून त्यावर विकासाची जाहिरात लावण्याचा निर्लज्ज प्रकार आहे. सरकारने पुन्हा एकदा आकड्यांचा खेळ केला आहे, पण या आकड्यांत शेतकऱ्याचा जीव, घाम आणि कर्जबोजा कुठेही दिसत नाही. अर्थसंकल्पातील तथाकथित तरतुदी पाहिल्या तर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी नसून शेतकऱ्यांच्या नावाने केलेली फसवणूक आहे. नारळ संशोधन केंद्रांच्या नावाखाली देशातील शेतकऱ्यांच्या हातात नारळ दिले आहे हे स्पष्ट होते. अशी टिका शेतकरी नेते, स्वाभीमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

Budget 2026: देशात धावणार ७ नवीन बुलेट ट्रेन! मुंबई, पुण्यासह ‘या’ ८ शहरांचा कायापालट होणार; 

सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विचार करूया. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा म्हणजे महिन्याला फक्त ५०० रुपये दिले जाणार आहे. आज खताचा एक गोणपाट १,५०० ते १,८०० रुपये आहे, डिझेलचे दर ९० रुपये लिटरच्या पुढे आहेत, बियाण्यांचे दर दुपटीने तिप्पटीने वाढले आहेत. एका एकराचा उत्पादन खर्च किमान ३५ ते ४५ हजार रुपये असताना ६ हजार रुपयांची मदत म्हणजे सरकारने शेतकऱ्याची थट्टा उडवली आहे. महागाई दरवर्षी वाढतो, पण ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहे. हे कोणते आर्थिक गणित आहे ? असाही प्रश्न शेट्टी यांनी विचारला आहे.

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करते, पण अर्थसंकल्पात त्याचे गणित कुठे आहे? जर उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर उत्पादन खर्च कमी करावा लागतो किंवा मिळणारा दर वाढवावा लागतो. उत्पादन खर्च वाढतच चालला आहे आणि हमीभावाला कायदेशीर दर्जा देण्याबाबत सरकार मुद्दाम मौन बाळगते. स्वामिनाथन आयोगाने सुचवलेला C2+50 टक्के फॉर्म्युला स्वीकारण्याची सरकारची हिंमत नाही, कारण त्यामुळे कॉर्पोरेट व्यापाऱ्यांचे नफे कमी होतील.

कर्जबाजारीपणाच्या प्रश्नावर हा अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी ठरतो. देशातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी कर्जात आहे. दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात, पण सरकार कर्जमाफीऐवजी कर्ज पुनर्रचनेची गुळगुळीत भाषा वापरते. कर्जमाफी म्हणजे आर्थिक शिस्त बिघडते, असे सांगणारे सरकार उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जमाफी मात्र एका सहीने माफ करते. हे दुहेरी आर्थिक धोरण नाही तर काय? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला.

Education Budget 2026: देशात ३ नवीन ‘AAIMS’ आणि आयुर्वेद संस्थांची घोषणा; अर्थसंकल्पात शिक्षण

कृषी क्षेत्राचा जीडीपीतील वाटा सुमारे १५ टक्के आहे, पण देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे. तरीही कृषी क्षेत्रासाठीचा अर्थसंकल्पीय वाटा अत्यंत तुटपुंजा आहे. सरकारला जर खरंच शेतकरी वाचवायचा असेल तर सार्वजनिक खरेदी व्यवस्था मजबूत करावी लागेल, बाजारातील दलालांची लूट थांबवावी लागेल आणि शेतमालाला किमान हमीभावाची कायदेशीर हमी द्यावी लागेल.

हा अर्थसंकल्प कॉर्पोरेटसाठी फायदेशीर आणि शेतकऱ्यांसाठी घातक आहे. आकड्यांच्या जंजाळामागे लपवलेली ही शेतकरीविरोधी नीती देशातील अन्नदाता उद्ध्वस्त करत आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ आहे, जाहिरातीचा विषय नाही. सरकारने हे आर्थिक वास्तव लवकरात लवकर समजून घेतले नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट आहे. असेही शेट्टी म्हणाले.

Web Title: Kolhapur news the central governments budget is like an empty plate for the farmers raju shetty criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • kolhapur news
  • raju shetty

संबंधित बातम्या

Defence budget 2026: संरक्षण क्षेत्रासाठी ७.८५ लाख कोटींची विक्रमी तरतूद; शस्त्रसामग्रीसाठी २.१९ लाख कोटी
1

Defence budget 2026: संरक्षण क्षेत्रासाठी ७.८५ लाख कोटींची विक्रमी तरतूद; शस्त्रसामग्रीसाठी २.१९ लाख कोटी

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 
2

Union Budget 2026: सामान्य माणसांची स्वप्नं भंगली! २०२६ च्या अर्थसंकल्पामुळे सर्वसामान्यांना धक्का; ‘या’ ५ गोष्टींची होती अपेक्षा 

Budget Explained: कुठून येतो पैसा आणि कुठे होतो खर्च? कसे असते सरकारी तिजोरीचे गणित; वाचा सविस्तर…
3

Budget Explained: कुठून येतो पैसा आणि कुठे होतो खर्च? कसे असते सरकारी तिजोरीचे गणित; वाचा सविस्तर…

Union Budget 2026: ‘मुघल-ए-आझम’पासून ते ‘बाहुबली’ अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही
4

Union Budget 2026: ‘मुघल-ए-आझम’पासून ते ‘बाहुबली’ अर्थसंकल्पावर मीम्सचा पाऊस; बजेटवर नेटिझन्सची मजेशीर क्रिएटिव्ही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.