Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur welcome arch demolished : कोल्हापूरकर झाले भावूक! तावडे हॉटेल चौकातील दोन दशकांची स्वागत कमान जमीनदोस्त

Kolhapur welcome arch: तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2025 | 05:28 PM
Kolhapur Two decades old welcome arch demolished at Tawde Hotel Chowk Kolhapur News

Kolhapur Two decades old welcome arch demolished at Tawde Hotel Chowk Kolhapur News

Follow Us
Close
Follow Us:
Kolhapur welcome arch demolished: कोल्हापूर : गेली अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरकरांसह पर्यटकांची स्वागत करणारी कमान तोडण्यात आली आहे. तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली. गुरुवारी (दि.06) रात्री महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात आली.
मागील २८ वर्षांपासून असलेला हा साक्षीदार जमीनदोस्त झाला आहे. या ठिकाणी परत एकदा आकर्षक कमान उभारण्यात येणार आहे.  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल चौकात महापालिकेच्या वतीने शहरात येणाऱ्या नागरिकांचे तसे पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली होती. गेली २८ वर्ष ऊन, वारा, पावसात या कमानीने येणाऱ्या लोकांचे स्वागत केले होते. मात्र गेल्या काही वर्षात या कमानीची दुरुस्ती झाली नव्हती.  कमानीचा काही भाग ढासळत चालला होता. त्यामुळे अपघात घडू नये यासाठी ही कमान उतरवण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून कमान उतरण्याचे काम सुरू केले. दोन पोकलेन, सहा डंपर, ब्रेकर आदी साहित्य घेऊन महापालिकेचे कर्मचारी कमानी जवळ दाखल झाले. त्यानंतर साडेदहा वाजता कमानीवरील स्वागत फलक काढण्यात आला आणि पावणे अकरा वाजता कमान पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
सुमारे दोन तासात कमान पूर्णता पाडण्यात आली. कमान खाली कोसळल्यानंतर डंपरच्या साह्याने कमानीचे साहित्य इतरत्र हलवण्यात आले. यादरम्यान शहरातून बाहेर जाणारे आणि शहरात येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. सदरची कमान पाडत असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  या दरम्यान अडथळा निर्माण होत झाल्याने पोलिसांनी त्यांना बाजूला हटवले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील, जल अभियंता हर्षदीत घाटगे, शहर अभियंता रमेश मस्कर ,मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, अग्निशामक अधिकारी मनीष रणभिषे, उप  शहर अभियंता निवास पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur two decades old welcome arch demolished at tawde hotel chowk kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • daily news
  • kolhapur
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन
1

Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
2

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल
3

Kolhapur News : चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी, प्रवाशांमध्ये दहशत; वनविभागाचे अधिकारी हतबल

Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा
4

Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.