कल्याण-डोंबिवली मनपा आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला (Photo Credit - X)
प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धत
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने केडीएमसी आगामी पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेची आगामी पालिका निवडणूक प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. १२२ सदस्य निवडीसाठी १२२ प्रभागांतून चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल अशा ३१ पॅनलची निवडणूक घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रभाग रचना जाहीर करून तिला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे.
महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण होणार निश्चित
त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने त्यानुसार कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबरला कल्याणातील आचार्य अत्रे नाट्य मंदिरात ही सोडत काढली जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
सोडतीनंतरचे वेळापत्रक:






