Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahalaxmi Temple : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट; 1500 कोटींच्या विकास आराखड्याला अमित शाह यांची ग्वाही

दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराचा तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून विकास कॉरिडॉर म्हणून कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 05:42 PM
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट; 1500 कोटींच्या विकास आराखड्याला अमित शाह यांची ग्वाही

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा होणार कायापालट; 1500 कोटींच्या विकास आराखड्याला अमित शाह यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • दक्षिणेची काशी ठरणार अधिक भव्य!
  • श्री अंबाबाई मंदिर परिसराचा 1500 कोटींचा विकास कॉरिडॉर
  • अमित शाह यांची मोठी घोषणा
कोल्हापूर : दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर शासनाच्या तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीतून खर्च करून हा परिसर विकास कॉरीडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत केंद्रीय गृहमंत्री शाह बोलत होते.

यावेळी अमित शाह यांनी सांगितले की, 7 व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या परिसरातील सुमारे 41 छोट्या-मोठ्या मंदिराचे संरक्षण करून येथील परिसर पुढील 6 महिन्याच्या आत विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी अन्नछत्र सुरू करण्याबाबत आपण सकारात्मक आहोत. आपल्या वारशाचे, संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्याला चालना देणारे हे शासन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारर्कीदीत आर्थिक, संरक्षण, सुरक्षा या सर्वच क्षेत्रात झालेल्या प्रगतीची मांडणी करताना देशातील घुसखोरांना अत्यंत बारकाईने शोधून काढण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागातील विकास गतीने सुरू असल्याचेही शाह म्हणाले.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! लग्नात अडथळा ठरणाऱ्या महिलेला शिक्षकाने संपवलं; तिघांना अटक

कोल्हापूर सहकाराची पंढरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी आग्रह धरला होता. राज्यातील 5 जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास सुरु आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. कोल्हापूर शहर हे केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील मंदिर परिसरातील आधुनिकीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला आज प्रारंभ झाला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर एक वेगळ्या उंचीवर जाईल. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. अमित शाह हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल शाह यांनी घडविले आहेत.

पालकमंत्री अबिटकर म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातर्गंत या ठिकाणी भाविकांना सुविधा निर्माण होतील. राज्यातील इतर सुविधांना ही केंद्र शासनाने गती देवून महाराष्ट्राचा विकास करावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संयोजकाच्या वतीने महालक्ष्मीची मूर्ती व तलवार देऊन सन्मान करण्यात आला. शाह यांच्या भाषणानंतर पालकमंत्री आबिटकर व महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते मंदिर विकास आराखडा गृहमंत्र्यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार धनंजय महाडिक तर आभार प्रदर्शन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Kolhapur Crime: सोशल मीडियावरून ओळख, लॉजवर नेऊन अत्याचार; व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल

Web Title: Amit shah announces rs 1500 crore development corridor for kolhapur mahalaxmi temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Amit Shah
  • kolhapur

संबंधित बातम्या

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
1

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत
2

पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला; जयकुमार गोरे यांचा दावा, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
3

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.