काय नेमकं प्रकरण?
गंगव्वा सत्यवान हंचीमणी (वय 25, रा. वंटमोरी, जि. बेळगाव) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. 29 मे रोजी तिलारी घाटातील कोदाळी गावाच्या हद्दीत झुडपात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, विजापूर, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील तब्बल 199 बेपत्ता महिलांची माहिती तपासली.
Solapur Crime: मुख्याध्यापकाने पत्नी-मुलांना विष पाजून केली आत्महत्या; 22 पानांची सुसाईड नोट सापडली
दरम्यान, पोलिसांनी बेळगावमधील तिलारीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात 25 मेच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक क्रूझर घाटातून दोडामार्गच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अवघ्या 20 मिनिटांत तीच गाडी पुन्हा तिलारीच्या दिशेने परतताना दिसली. पोलिसांनी गाडीचा नंबर ट्रेस केला असता, त्याच गाडीचा 25 मे रोजी कोदाळी गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर आली.
सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मृत महिला गंगव्वा हंचीमणी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती एका तरुणासोबत दुचाकीवर फिरत असल्याचेही समोर आले. पोलिसांना संबंधित तरुण शिनोळी फाट्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
शिक्षकाचं महिलेसोबत प्रेमसंबंध
मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करणावर (वय 33) हा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील राजकट्टी येथील शिक्षक आहे. त्याचे घटस्फोटित गंगव्वासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गंगव्वा त्याच्या होणाऱ्या लग्नात अडथळा आणत असल्याच्या संशयातून त्याने हा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
बसवराजने गंगव्वाला विशाळगडला फिरायला जाण्याचा बहाणा करून सोबत नेले. दोघे दुचाकीवरून निघाले असताना वाटेत आरोपीचे वडील आणि मामा क्रूझर घेऊन आले. शिनोळी येथे दुचाकी ठेवून गंगव्वाला क्रूझरमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर क्रूझरमध्येच तिचा खून करून मृतदेह तिलारी घाटातील झुडपात फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी बसवराज यल्लाप्पा करणावर याच्यासह त्याचे वडील यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (वय 57) आणि मामा लगमाप्पा अंकलगी (वय 37, रा. केंचनकट्टी, जि. बेळगाव) यांना अटक केली आहे. तर क्रूझर चालक बाबू हा अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असून, त्यालाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या थरारक हत्याकांडाचा उलगडा केल्याने त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भरधाव ट्रक थेट लॉजमध्ये घुसला, एकाचा मृत्यू तर एक जखमी; धुळे-सोलापूर हायवेवर भीषण अपघात
Ans: गंगव्वा सत्यवान हंचीमणी असे मृत महिलेचे नाव आहे.
Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या तपासातून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.
Ans: शिक्षक, त्याचे वडील आणि मामा अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.






