Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम; आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापुरात ठरणार

महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 06:14 PM
Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला विरोध कायम; आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापुरात ठरणार
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : महायुती सरकारने शपथविधी घेतल्यानंतर शंभर दिवसाच्या करावयाच्या कामांच्या उद्दिष्टांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा समावेश केला आहे. त्यामुळे दुसरीकडे आता शेतकरी देखील आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहेत. पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०  वाजता कोल्हापुरातील राजर्षि शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. अशी माहिती विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली आहे.

महायुती सरकारने डिसेंबर महिन्यात शपथ घेतल्या नंतर महायुती सरकार हे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. वेगवगेळे आराखडे तयार केले आहेत अशा बातम्या देखील सरकार फिरवत आहे. पण कोणतेही अधिकृत पेपर सर्क्युलर, नोटिफिकेशन सरकारकडून प्रसिद्ध होत नाही. हा महामार्ग करण्यासाठी ते खोट्या प्रचाराचा देखील आधार घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करत सांगितले की, या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे.

हेही वाचा : शक्तीपीठ महामार्गामुळे ‘या’ परिसराला..”; शेतकऱ्यांनी लिहिली मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र

खरे तर या विरोधात १२ पैकी दहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या फेब्रुवारी २०२४ पासून आंदोलन करत आहेत. याला उत्तर म्हणून शेतकऱ्यांनी २४ जानेवारी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन १० जिल्ह्यांमध्ये केले. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांना त्यांचे इंटेलिजन्स व पोलीस हे या सर्वांची माहिती देतात. तरीदेखील पुन्हा एकदा वस्तुस्थितीचा विपर्यास करत नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा स्टेटमेंट दिले की शक्तीपीठ महामार्गाला सर्व आमदारांनी समर्थन दिले आहे, ही गोष्ट देखील खरी नाही. )

शक्तीपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे, पर्यावरणाचे, करदात्यांचे, जनतेचे सर्वांचेच नुकसान होणार आहे. पर्यायी महामार्ग असताना त्याचे रुंदीकरण व दर्जा सुधारण्याची गरज असताना केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत.  त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्यातील एकजूट घडवत आरपारची लढाई करायचे ठरवले आहे. यासाठी राजर्षि शाहू महाराजांच्या भूमीमध्ये २० फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तेथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.  या व्यापक बैठकीस कोल्हापूर सहित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील व संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले आहे.

हेही वाचा: संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध

संपूर्ण शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा; संघर्ष समितीचा कडाडून विरोध

राज्यातील बारा जिल्ह्यांतून जाणारा प्रस्तावित संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून लढा सुरू आहे. परंतु, सरकारने हा रस्ता करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू केल्या आहेत. त्याला तीव्र विरोध असून, तो रद्दच झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात राज्यव्यापी बैठकीत लढ्याचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी दिला.

Web Title: Farmers protest against shaktipeeth expressway satej patil maharashtra government kolhapur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • Shaktipeeth Expressway

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या
1

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!
2

Kolhapur News : पेट्रोल-डिझेल 3 रुपयांनी महागलं,कोल्हापुरात इंधन दरवाढीचा भडका!

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 
3

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.