Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब

नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 'पैसा उडाला, मत मिळालेच नाही' अशा स्वरूपाची परिस्थिती अनेक उमेदवारांच्या वाट्याला आलेली पाहायला मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 08:14 PM
Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब
Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा
  • मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब
दीपक घाटगे /कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ‘पैसा उडाला, मत मिळालेच नाही’ अशा स्वरूपाची परिस्थिती अनेक उमेदवारांच्या वाट्याला आली आहे. निवडणुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना यंदा मात्र हा खर्च अक्षरशः कोट्यवधींच्या घरात पोहोचला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब, प्रचारासाठी मोठमोठे तंबू, स्टेज, वाहन ताफे, सोशल मीडिया मॅनेजमेंट, संपर्क मोहिम, उद्योगांमधून आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न अशा सर्व स्तरांवर पैशांची उधळपट्टी झाल्याचे उघड झाले. पण एवढा खर्च करूनही अपेक्षित निकाल न लागल्याने अनेक उमेदवारांचे कोट्यावधींचे ‘पाणी’ झाले आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच उमेदवारांनी याच अनुभवातून धास्ती घेतली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील परिस्थिती पाहून महापालिकेतील संभाव्य उमेदवार आपआपल्या गणितांचा फेरविचार करत आहेत. महापालिका निवडणूक ही आणखी मोठ्या प्रमाणावर आणि प्रतिष्ठेची असते. प्रचारासाठी लागणारा खर्च नगरपालिका निवडणुकीपेक्षा किमान तीन ते चारपट जास्त असतो. त्यातच विभागीय राजकारणातील गुंतागुंत, पक्षनिष्ठा, स्थानिक नेत्यांची नाराजी, बंडखोरी, गटबाजी असे अनेक घटक या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे ‘फायदा नाही आणि खर्च प्रचंड’ अशी भीती अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे.

यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणच्या प्रभागात 30 ते 40 लाखांपर्यंत खर्च झाल्याची चर्चा आहे. नगराध्यक्ष पदासाठी तर काही उमेदवारांनी 2 ते 3 कोटींपर्यंतचा खर्च केल्याच्या कुजबुज सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांना लक्ष्य करणारे सोशल मीडिया कॅम्पेन, लाभार्थी गटांना वेगवेगळे ‘पॅकेज’ देण्याचे प्रयत्न, वॉर्डमध्ये रस्ते-दुरुस्तीच्या नावाखाली केलेली तात्पुरती कामे, देवदर्शन सहली असे अनेक पर्याय वापरले गेले. पण यापैकी बहुतेक ठिकाणी पैसा आणि मतांचे समीकरण जुळलेच नाही. याचा परिणाम आता महापालिका निवडणुकीच्या तयारीवर स्पष्ट दिसत आहे.

Satara News : सातारा-कास रोडवर डंपर ट्रकचा सुसाट प्रवास! अवजड वाहनांवर नियंत्रण घालावं, नागरिकांची मागणी

‘मोठी गुंतवणूक आणि मोठी जोखीम’

काही नेत्यांनी तर आपल्या कार्यकत्यांना आधीच सूचित केले आहे की ‘खर्चाचा भार पेलता आला नाही, तर उमेदवारी टाळावी, तर काही ठिकाणी मोठे उद्योगपती, बिल्डर लॉबी यांना उमेदवारी देण्यासाठी राजकीय पक्षांनी संपर्क सुरू केला आहे. कारण महापालिका निवडणूक म्हणजे ‘मोठी गुंतवणूक आणि मोठी जोखीम’ असा अनेकांचे समीकरण झाले आहे.

तिकीट मिळाले तरी खर्च उमेदवारांना पेलणार का?

सध्या महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांनी आपला ‘महापालिका प्लॅन काही प्रमाणात थांबवला आहे. ज्याठिकाणी अपेक्षित प्रभाग मिळाला नाही, त्या ठिकाणी वातावरण निवळेपर्यंत उमेदवारी जाहीर करण्याचे धाडस कोणी करत नाही. तिकीट मिळाले तरी खर्च पेलवणार कसा हा मोठा प्रश्न समोर आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदाच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळालं?

    Ans: यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांनी प्रचंड पैसा खर्च केला, मात्र अपेक्षित मते मिळाली नाहीत. त्यामुळे “पैसा उडाला, पण निकाल हातातून गेला” अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून आली.

  • Que: एका प्रभागासाठी किती खर्च झाल्याची चर्चा आहे?

    Ans: काही नगरपालिकांमध्ये एका प्रभागासाठी 30 ते 40 लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे.

  • Que: नगराध्यक्ष पदासाठी किती खर्च झाल्याचे सांगितले जाते?

    Ans: नगराध्यक्ष पदासाठी काही उमेदवारांनी 2 ते 3 कोटी रुपये खर्च केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.

Web Title: Kolhapur news crores of rupees wasted in nagar panchayat municipality elections various methods adopted to attract voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी
1

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार घोषित; कोणाला संधी?
2

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार घोषित; कोणाला संधी?

Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 
3

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन
4

Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.