Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 16, 2025 | 05:23 PM
धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सागर करमळकर आणि सुषमा करमळकर असं मृत दांपत्याचं नाव असून मे महिन्यातच दोघांच लग्न झालं होतं. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करमळकर दांम्पत्य काल आंबोलीला फिरायला गेलं होतं. दरम्यान आज सकाळी त्यांच्या मित्रांनी त्यांना फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही. मित्र त्यांना फोन करत होते, पण त्यांनी फोन उचलला नाही. मात्र काही वेळानंतर फोन स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे मित्रांना काळजी वाटली. त्यांनी थेट करमळकर यांचं घर गाठलं. मात्र दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तरी आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाला, शेवटी त्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.

घरात सगळीकडे पाहिलं. कोणीही दिसलं नाही. मात्र बाथरूममधून दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सागर करमळकर आणि सुषमा दोघंही बेशुद्धावस्थेत पललेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं.

प्रेयसीच्या घरासमोर गेला आणि स्वतःवर टाकला पेट्रोल; नंतर जे घडलं ते हादरवणारं

सागर आणि सुषमा अवघ्या महिन्याभरापूर्वीच विवाहबंधनात अडकले होते. गेल्या रविवारी आंबोली येथे फिरायलाही गेले होते. दरम्यान बाथरूममधील गॅस गिझरमधून वायू गळती होऊन कार्बन मोनॉक्साईड वायू जमा झाला असावा आणि यातच श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेने करमळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच नवीन आयुष्य सुरू केलेल्या या तरुण जोडप्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

Web Title: Newlywed couple died suffocation after gas leak in kolhapur district ajra taluka latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • gas leak
  • kolhapur news
  • Kolhapur Police

संबंधित बातम्या

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर;  गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?
1

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?
2

Kolhapur News : इंधनखर्चात लाखोंची बचत ; इचलकरंजी पालिकेच्या ताफ्यात ‘ईव्ही’ येणार ?

Kolhapur News : हुल्लडबाजी आणि अश्लीलता; लोककलेचं बदलत जाणारं धक्कादायक वास्तव्य
3

Kolhapur News : हुल्लडबाजी आणि अश्लीलता; लोककलेचं बदलत जाणारं धक्कादायक वास्तव्य

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश
4

Kolhapur News : पूरमुक्तीसाठी इचलकरंजीला 450कोटी निधी; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.