मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाचे नाव अजय कुशवाह (२४ वर्षीय ) असं आहे. या तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले? चला जाणून घेऊया.
सराईत गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीने पलिसांना धक्काबुक्की केली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुशवाह हा मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथील रहिवासी होता. अजय कुशवाह याने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वात:ला पेट्रोल टाकून पेटवून घेतले. असं करण्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रेयसी त्याच्यासोबत बोलत नव्हती, त्यामुळे आज मानसिक तणावात होता. या तणावात शनिवारी प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून अजयला रुग्णालयात नेले. अजय रुग्णालयात दाखल केले. अजय हा ७५ टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अजयचे जळत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजयच्या वडिलांनीचे गंभीर आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयचे वडील भाजीपाला विकतात तर अजय कुशवाह हा फर्निचरचे काम करतो. अजयच्या वडिलांनी मुलीवर गंभीर आरोप केला आहे. अजयची प्रेयसी त्याला लग्नाचे अमिश दाखवून पैसे उकळत होती. कालांतराने मुलीकडून होणाऱ्या पैश्याची मागणी मागणी खूप वाढली, जी अजय पूर्ण करू शकला नाही, म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
अजय आणि त्याच्या प्रेयसीमध्ये आधी चांगली मैत्री होती. नंतर दोघांची मैत्री प्रेमप्रकरण मध्ये बदलली. मात्र भांडणामुळे प्रेयसीने अजयशी बोलणे बंद केले. यामुळे अजय नैराश्यात होता. याच तणावातून त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
आयटी कंपनीतील २२ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; घरात सापडली चिठ्ठी