• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Rahul Awade Vs Madan Karande Main Fight In Ichalkaranji Constituency For Maharashtra Assembly Election 2024

राहुल आवाडे की मदन कारंडे? इचलकरंजीत कोण मारणार बाजी? तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण

सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. सकाळच्या पहिल्याच सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासातच तब्बल २३ हजार ३४२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2024 | 08:57 PM
राहुल आवाडे की मदन कारंडे? इचलकरंजीत कोण मारणार बाजी? तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण

इचलकरंजीमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण (फोटो-istockphoto )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी:  इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बुधवारी मध्यंतरीचा काळ वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद, तांत्रिक बिघाड वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ४ नंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहिली. मतदारसंघात सरासरी ६५ ते ६७ टक्के मतदान  झाल्याचे समजते.

महायुतीच्या वतीने राहुल आवाडे, महाविकास आघाडीच्या वतीने मदन कारंडे आणि अपक्ष विठ्ठल चोपडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यापैकी राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यातच अत्यंत मुख्य लढत आहे. अपक्ष विठ्ठल चोपडे हे किती मते घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे. एकूण ३ लाख १२ हजार ६६४ मतदारांची नोंद झाली होती. एकूण २६६ मतदान केंद्रांपैकी २४३ केंद्रे ही वेबकास्टिंग मतदान केंद्रे होती. तर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध १४ मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या संकल्पना (थीम) राबविण्यात आल्या होत्या.

सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. सकाळच्या पहिल्याच सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासातच तब्बल २३ हजार ३४२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन तासाच्या कालावधीत ही आकडेवारी ६१ हजार ८१२ म्हणजे १९.७७ टक्के होती. पहिल्या दोन्ही सत्रात महिलांची टक्केवारी लक्षणीय होती. दुपारी १ वाजेपर्यंत त्यामध्ये ४१ हजार मतदारांची भर पडून आकडेवारी १ लाख २ हजार ५२८ इतकी झाली. तीन वाजल्यानंतर शहरातील अनेक केंद्रांवर उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांना मतदार आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती. सर्वांचे रुसवे, फुगवे काढत आणि मागणी पूर्ण केल्यानंतरच मतदार वाहनातून गटागटाने मतदान केंद्रावर येताना दिसत होते. शहरातील दाट लोकवस्तचा परिसर असलेल्या बहुतांशी केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारच नसल्याचे चित्र होते. मात्र चारनंतर हीच मतदान केंद्रे नागरिकांच्या रांगा लागल्याने गर्दीने फुलून गेली होती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळा उडाली. तर पोलिसांनाही कसरत करावी लागली.

महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी चंदूर येथे, आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी डीकेटीई नारायण मळा, अपक्ष उमेदवार चोपडे यांनी कै. सुभेदारकाका विद्या मंदिर, आमदार प्रकाश आवाडे यांनी नुतन मराठी विद्यालय आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सरस्वती हायस्कुल येथील केद्रांवर मतदान केले.

काही ठिकाणच्या केंद्रांवर एकमेकांच्या समोरा समोर आल्यानंतर उमेदवार समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. मतदारांच्या सोयीसाठी सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्र परिसरात बुथ उभारणी करुन आधुनिक यंत्रणेच्य माध्यमातून सहकार्य केले जात होते.

विधानसभा मतदारसंघातील लढतीची परिस्थिती लक्षात घेता तांबेमाळ, जवाहरनगर, शहापूर, विक्रमनगर, कोल्हापूर नाका परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तर अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्याचे प्रभारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. परराज्यातूनही मागविण्यात आलेल्या फौजफाट्यानेही आपले कर्तव्य चोखपणे बजावले. सायंकाळी सहानंतर सर्वच मतदान केंद्रावरील मशिन्स नेण्यासाठी वाहने तैनात होती. तर प्रक्रिया पूर्ण होईल त्यानुसार मतदान यंत्रणे उमेदवार प्रतिनिधींसमोर सील करुन मध्यवर्ती केंद्र करण्यात आलेल्या राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे रवाना केली जात होती. त्याठिकाणी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रे स्विकारुन ती स्ट्राँगरुममध्ये ठेवली जात होती.

Web Title: Rahul awade vs madan karande main fight in ichalkaranji constituency for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 08:56 PM

Topics:  

  • Election Comission
  • Ichalkaranji
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…
1

बनावट नोटा बनवणाऱ्या आरोपींना अटक; युट्युबवर व्हिडीओ पाहून नोटा छापायला शिकले, घरातच…

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…
2

100 अन् 500 च्या बनावट नोटा छापायचे, पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या; सापळा रचला आणि…

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या
3

इचलकरंजी महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर; 18 लाखाच्या फसवणूकप्रकरणी दाेघांना ठोकल्या बेड्या

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
4

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा, कमी बजेटमध्ये खरेदी करा सुंदर दागिने

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

वेळेआधीच मुली झाल्या तरूण; सुरु झाली मासिक पाळी, 40 व्या वर्षीच व्हाल म्हातारे! लठ्ठपणा, डायबिटीसचा पडेल घेरा

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.