Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा! आता शेतक-यांसमोर 4 महत्त्वाची आव्हाने, तांदळाच्या उत्पादनाला किडींचा धोका वाढला

शेतकऱ्यांची आव्हानं काही संपत नाहीत. आता तांदळाला कीड लागल्यामुळे त्यांच्यासमोर ४ नवी आव्हानं निर्माण झाली आहेत. आता नेमके हे कोणते आव्हान आहे ते शेतकऱ्यांनी जाणून घ्यावे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 18, 2026 | 12:34 PM
शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं (फोटो सौजन्य - iStock)

शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोरील आव्हानं नेमकी काय आहेत 
  • तांदळाला कीड लागण्याचा धोका वाढला
  • काय सांगतात तज्ज्ञ
भारत हा जगभरातील तांदूळ उत्पादक देशांपैकी एक प्रमुख उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. जगभरातील तांदूळ उत्पादनापैकी एकमेव भारत देशात २८ टक्के तांदूळ पिकवला जातो. देशात  भाताचे एकूण सुमारे १५ कोटी मेट्रिक टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. हे यश भारताची सक्षम कृषी व्यवस्थापन आणि शेतक-यांची जिद्द दर्शवते. मात्र तांदूळ उत्पादनासमोर आजही जुनी आव्हाने आ वासून उभी आहेत. 

२०२५-२६ या कालावधील भारतातील तांदळाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टर ४ हजार ३९० किलोग्रॅमपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला गेला आहे. परंतु स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे सर्व भागांतील उत्पादनात एकसमानता नसल्याने खरे आव्हान समोर उभे राहते. किडींच्या प्रादुर्भावामुळे पुरेसे भाताचे उत्पादन मिळत नाही. यामुळे पिकांचे उत्पादन घटते. शेतक-यांचे आर्थिक नुकसान होते. गोदरेज अग्रोव्हेटचे पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.के.राजावेलू यांनी तांदूळ उत्पादक शेतक-यांसमोरील किडीसंबंधी चार प्रमुख आव्हानांवर माहिती दिली आहे ती जाणून घेऊया. 

‘या’ 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

१. सहज लक्षात न येणा-या किडींचा धोका 

तांदूळ उत्पादनात पान गुंडाळणारी अळी आणि खोडकिडा या सर्वाधिक नुकसान करणा-या किडी असल्याचे शेतकरी सांगतात. रोपांची लागवड झाल्यानंतर साधारणतः दोन ते चार आठवड्यांनी खोडकिड्याचा प्रादुर्भाव सुरु होतो. ही कीड खोडाच्या आत शिरते. त्यामुळे सुरुवातीला या किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही. पिके कोमेजू लागल्यानंतर किंवा डेड हार्टचे लक्षण आढळल्यानंतर किड लागल्याचे कळते. 

तांदूळ पिकाला ही कीड लागल्यास ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. याच कालावधील पान गुंडाळणा-या अळीचाही प्रादुर्भाव वाढतो. ही अळी पान गुंडाळून हरितद्रव्याच्या कार्यात बाधा आणते. परिणामी, प्रकाश संश्लेषण खंडित झाल्याने पिकांची वाढ खुंटते. ही कीड सुरुवातीला दिसून येत नाही. त्यामुळे वेळेत नियंत्रित करणे कठीण होऊन जाते. या किडीचा आटोक्याबाहेर प्रादुर्भाव दिसून आल्यास २० ते ३० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. अनेकदा मोठे नुकसान झाल्यानंतर दोन्ही किडींचा प्रादुर्भाव लक्षात येतो. त्यामुळे शेतक-यांना योग्य वेळी उपाययोजना करणे कठीण होऊन जाते. 

२. पिकाच्या वाढीच्या काळातच किडींचा वाढता प्रादुर्भाव 

तांदळाचे पीक वाढत असतानाच किडींचा प्रादुर्भाव होत असतो. सुरुवातीच्या काळात खोडकिडा पिकाचे नुकसान करतो. हे नुकसान तातडीने लक्षात येत नाही. लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांच्या कालावधीत फुटवे येण्याच्या आणि कणसे धरण्याच्या टप्प्यावर खोडकिडा आणि पान गुंडाळणारी अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तांदूळ शेतीसाठी आवश्यक असलेले उष्ण-दमट आणि पाणथळ वातावरण या किडींच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे वर्षभर किडींचा धोका कायम राहतो. विविध टप्प्यांवर सतत होणा-या प्रादुर्भावामुळे शेतक-यांना त्वरित उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, पिकांचे नुकसान होते.  

३. पीक संरक्षण योजनेतील मर्यादा 

बाजारात उपलब्ध कीटकनाशके किडींपासून पूर्णपणे संरक्षण देत नाही, अशी खंत शेतकरी वर्गाने व्यक्त केली. या कीटकनाशक औषधांचा प्रभाव फार काळ न राहणे, औषधांचा परिणाम अपेक्षित काळात न दिसणे, वारंवार फवारणी यांमुळे शेतक-यांच्या खर्चात वाढ होते, शिवाय या कामात जास्त  काल लक्ष केंद्रित करावे लागतात. 

७७ टक्के भात उत्पादक शेतकरी किडींवर जलद नियंत्रण उपायांना दिर्घकाळ संरक्षण पुरवणा-या उपायांना प्राधान्य देत असल्याचे गोदरेज अग्रोव्हेटच्या सर्वेक्षणात दिसून आले. शेतक-यांना कमी हस्तक्षेपात परिणामकारक आणि विश्वासार्ह कीड नियंत्रणांच्या उपायांची गरज असल्याचे या सर्व्हेक्षणात अधोरेखित करण्यात आले.  

फोर्टिफाइड राईस! कधी ऐकलयं का? याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या हे सामान्य तांदूळपेक्षा कसे वेगळे आहे

४. तांदळाच्या वाढत्या शेतीमुळे प्रभावी कीड नियंत्रणाची गरज 

देशात तांदळाला चांगला बाजारभाव मिळतो. या पिकाची मागणीही वाढत असल्याने येत्या काळात तांदळाचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या लागवडी क्षेत्रासह किडींचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती आहे. तांदळाच्या पिकाला कमी किड लागली तरीही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रचंड आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतक-यांना मोठ्या शेतजमिनीवर प्रभावीपणे काम करणारे आणि योग्य वेळी वापरल्यावर पिकांचे संरक्षण करणारे कीड नियंत्रण उपाययोजना गरजेची आहे. यामुळे नुकसान टाळता येईल, अशी विश्वासार्ह यंत्रणा असावी याकडे त्यांचा कटाक्ष आहे. 

भातशेतीचा विस्तार होत असला तरीही दर्जेदार उत्पादनाच्या निर्मितीत किडींचे संकट हे मोठे आव्हान आहे. अशा वेळी शेतक-यांना जलद, कार्यक्षम आणि पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यात संरक्षण देणा-या साधनांची गरज आहे. आता ‘गोदरेज अग्रोव्हेट टकाइस’ हे नवे उत्पादन या समस्येवर रामबाण उपाय ठरु लागले आहेत. हे उत्पादन किडींवरव तत्काळ नियंत्रण मिळवून देते. दीर्घकाळ संरक्षण देते. शिवाय शेतीपिकांचा दर्जाही अबाधित राहतो. 

Web Title: Farmers now face four major challenges the threat of pests to rice production has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • farmer
  • Farmer Crisis
  • India news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
1

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
2

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
3

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर
4

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.