Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Rain Update: कोल्हापूरकरांसाठी अलर्ट; पुढील चार दिवस काळजीचे, कसा होणार पाऊस?

यंदा अवकाळी पावसाने कहरच केला आहे.  गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस सुरू झाल्याने हा पाऊस ऊस पिकाला पोषक असला तरी अन्य पिकाला घातक ठरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2025 | 07:20 PM
Kolhapur Rain Update: कोल्हापूरकरांसाठी अलर्ट; पुढील चार दिवस काळजीचे, कसा होणार पाऊस?
Follow Us
Follow Us:

कोल्हापूर: अवकाळी पावसाबरोबरच यंदा मान्सून वेळेच्या अगोदरच दाखल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे .सततच्या या पावसामुळे गेल्या काही वर्षात प्रथमताच रोहिणीचा पेरा शेतकऱ्यांचा चुकला आहे. तर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर यंदाची पेरणी होती का नाही याबाबतची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. हवामान विभागाने शुक्रवार पर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पावसाचेच राहण्याची शक्यता अधिक आहे.

यंदा अवकाळी पावसाने कहरच केला आहे.  गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस सुरू झाल्याने हा पाऊस ऊस पिकाला पोषक असला तरी अन्य पिकाला घातक ठरला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या पिकाबरोबरच उन्हाळी पिके सुद्धा घेतली आहेत. मात्र या पावसामुळे या सर्व पिकावर पाणी फिरवले आहे. पिके काढणीला आली असताना पावसाचा जोर राहिल्याने हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा,राधानगरी, भुदरगड तर राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. या पावसामुळे ओढ, नाले दुथडी भरून वाहू लागले असून त्याच बरोबर गटारी सुद्धा भरून वाहू लागले आहेत. सततच्या या पावसामुळे छोट्या-मोठे रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबून राहिली आहे. पंचगंगा, वारणा ,तुळशी ,भोगावती, कुंभी ,कासारी या नदीवरील असणारे बंधारे ओव्हरफ्लो झाल्यामुळे बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे.

आज सोमवारी काही अंशी पावसाने उसंत खाल्ली असली तरी अधून मधून सरी कोसळतच होत्या. पावसाचा जोर असल्याने नागरिकांनी छत्री, रेनकोट ,जॅकेट, पावसाळी टोपी खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी केली आहे. यामध्ये शालेय मुलांची संख्या लक्षणे दिसत होती. अवघ्या काही दिवसावर शालेय सत्र सुरू होणार असल्याने पालकांनी आपल्या  पाल्याची पावसाळ्यातील सुरक्षितता घेण्यासाठी काळजी घेतली आहे.

राज्यासाठी काही दिवस काळजीचे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अवकाळी पावसाने झोडपून काढल्यावर मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Red Alert To Maharashtra: राज्यासाठी काही दिवस काळजीचे; कोकणात मुसळधार तर घाटमाथ्यावर…
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मोठ्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि सरकारने केले आहे. मान्सून वेळेआधीच मुंबईत दाखल झाला आहे.

Web Title: Weather department gave orange alert to kolhapur for next 4 days maharashtra rain update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 07:14 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Kolhapur Rain
  • maharashtra weather alert

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.