राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अवकाळी पावसाने झोडपून काढल्यावर मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात मोठ्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि सरकारने केले आहे. मान्सून वेळेआधीच मुंबईत दाखल झाला आहे.
येत्या २४ तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाचा जोर वाढू शकतो. येत्या काही दिवसांत मान्सूनचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढलेला दिसायला मिळणार आहे. कोकण विभागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सध्या सर्व राज्यभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागत तुफान पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. काही ठिकाणी कमी आहे. मात्र काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत कोकण विभागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain: महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले; तब्बल ३४६ मिलिमीटर तुफान पावसाची नोंद
महाबळेश्वरला अवकाळीने झोडपून काढले
26 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हवामान खात्याचा अहवालानुसार महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवकाळीच्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील बेंडा नदी लिंगमळा धबधबा व इतर नाले उसंडून वाहत आहेत. पर्यटकांच्या आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाल्याने थंडीच्या सरी धोके याचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर मध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.