
Konkan Railway: कोकण रेल्वेला मुंबईत नो एन्ट्री? इतर गाड्याही पनवेलला नेण्याचा प्रयत्न
कोकण रेल्वेला पनवेलपुढे एन्ट्री नसल्याची चिंता
कोंकणी प्रवाशांनी व्यक्त केली भीती
कोकण विकास समितीने मांडले मत
खेड: पायाभूत कामे सुरू असून, ही कामे झाल्यानंतर कोकणातील रेल्वेगाड्यांना पनवेल येथेच अंतिम थांबा देण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील कोकणवासीयांसाठी कोकणातील रेल्वेगाड्या मुंबईतील टर्मिनसमध्ये आणल्या जाणार नसल्याची भीती कोकणी प्रवाशांकडून व्यक्त केली. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नेत्रावती, मत्सगंधा रेल्वेगाड्यांना पनवेलपर्यंतच चालवण्यात येत असल्याने, भविष्यात रेल्वेगाड्यांना मुंबईत मार्ग खुला केला जाणार नसल्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवण्यात येत आहे.
करोनापूर्वी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी-दादर पैसेंजरला यायला उशीर झाल्यास ती गाडी दिव्यातच थांबवून गाडी क्र. ५०१०३ दादर-रत्नागिरी पैसेंजर दिव्यातूनच परत पाठवली जात असे. करोनानंतर ही गाडी कायमस्वरूपी रत्नागिरी-दिवा रत्नागिरी झाली. इतर गाड्याही हळूहळू पनवेलला नेण्याचा रेल्वेचा प्रयत्न असू शकतो, असे मत कोकण विकास समितीद्वारे व्यक्त करण्यात आला.
‘या’ रेल्वेंना मोठा प्रवासी वर्ग
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील पिट लाइन क्रमांक ३ च्या देखभालीचे कारण देत, गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस आणि १२६१९/१२६२० मत्स्यगंचा एक्स्प्रेस पनवेल येथेच थांबवण्याचा व तेथूनच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु, या बदलामुळे प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. नेत्रावती आणि मत्स्यगंधा या एक्सप्रेसवर मोठा प्रवासी अवलंबून आहे. परंतु, या रेल्वेगाडवा पनवेलपर्यंतच चालवण्यात येत असल्याने, प्रवाशांना प्रचंड आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे सामानासह हाल
कोकण किनारपट्टी ते मुंबई दरम्यान रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या पनवेल येथे वारवार कमी अंतरावर थांबवल्या जात असून तेथूनव पुन्हा सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. प्रवासाचा वेळ, खर्च व शारीरिक त्रास वाढतो विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व सामानासह प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होत आहेत, गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस व गाडी क्रमांक १२६२० मंगळूरु सेंट्रल-लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस २९ जानेवारीपर्यंत पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. ही रेल्वेगाडी पनवेल ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान अंशत राहील.
मध्य रेल्वेवर ३० जानेवारीपर्यंत असणार ब्लॉक
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस व गाडी क्र. १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस ३१ जानेवारीपर्यंत पनवेल येथून सुटेल.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.