Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरेगाव शहराचा ठोस आणि श्वाेस्वत विकास करणार : आमदार महेश शिंदे

सर्वांगिण विकासासाठी सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास टाकून नगरसेवकांना निवडून दिले आहे. शहराचा चोहोबाजूंनी मोठा विस्तार होत आहे. या शहराचा ठोस आणि श्वाास्वत विकास करणार आहे. असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2022 | 01:23 PM
कोरेगाव शहराचा ठोस आणि श्वाेस्वत विकास करणार : आमदार महेश शिंदे
Follow Us
Follow Us:

कोरेगाव : शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरा आहे. या शहराने केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला एकाहून अधिक रत्ने दिली आहेत. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वसामान्य जनतेने मोठा विश्वास टाकून नगरसेवकांना निवडून दिले आहे. शहराचा चोहोबाजूंनी मोठा विस्तार होत आहे. या शहराचा ठोस आणि श्वाास्वत विकास करणार आहे. नजिकच्या काळात कोट्यवधी रुपयांची विकासकामे टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत, त्याद्वारे नगरपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नामध्ये निश्चिकतपणाने वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षे रखडेला पगाराचा प्रश्न सुटेल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

कोरेगाव ग्रामपंचायतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वाभूमीवर रविवारी जुना मोटार स्टँड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये नगरपंचायतीच्या वतीने माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक यांचा सत्कार आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी शहरवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य सुरेश कुलकर्णी, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे, माजी सरपंच जगनशेठ झांजुर्णे, सदभाऊ शेटे, ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांच्यासह विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक उपस्थित होते.

आ. शिंदे पुढे म्हणाले की, आताच्या आणि मागच्या पिढीने कोरेगाव शहराला घडविले आहे, नवा आकार दिला आहे. कोरेगावकरांची मान देशपातळीवर उंचावली गेली आहे, अशी रत्ने या मातीत तयार झाली आहेत, घडली आहेत. त्याच धर्तीवर नव्या पिढीला मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र आताची पिढी तशी राहिलेली नाही, किंबहुना राहील, असे वाटत नाही. ही पिढी सोशल मिडियावर आधारित आपले मत बनवत आहे, त्यात वास्तविक काय आणि नेमकेपणाने काय, हे त्यांना समजून येत नाही, त्यामुळे नव्या पिढीला संस्कारक्षम बनविले पाहिजे, त्यांना आतापासून संस्काराचे धडे गिरविण्यास शिकवले पाहिजे, त्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून संस्कार केंद्रे सुरु केली पाहिजेत.

सुनील खत्री म्हणाले की, कोरेगाव शहराने आजवर सर्वांनाच काम करण्याची संधी दिली. ग्रामपंचायत असो की नगरपंचायत कोरेगाव शहरवासियांनी विकासकामांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निश्चेय केला आहे. आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची धुरा हाती घेतल्यापासून शहराचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांनी विकासकामे केली असून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. आजवरच्या शहराच्या वाटचालीमध्ये ज्यांचे-ज्यांचे योगदान आहे, अशा महनीय व्यक्तींचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. कोरेगाव ग्रामपंचायतीला स्वत:च्या हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांच्याकडून बाजारपेठेतील जागा वर्ग करुन घेतली, त्यामुळे आज डौलदार इमारत उभी राहू शकली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ऍड. चंद्रशेखर बर्गे, महेश बर्गे व सुनीलदादा बर्गे यांनी आपल्या मनोगतामध्ये कोरेगाव शहरातील विकासकामांचा आढावा घेत ग्रामपंचायत ते नगरपंचायत या प्रवासावर विस्तृतपणाने भाष्य केले. ग्रामपंचायत काळात शहराचा खर्यार अर्थाने विकास झाला, राज्यात कोरेगावने एक वेगळे स्थान निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच जगनशेठ झांजुर्णे व सदभाऊ शेटे यांनी आपल्या मनोगतामध्ये आज झालेला सत्कार हा कायम स्मरणात राहील, कोरेगावसाठी काही तरी करता आले, याचा मनापासून आनंद होत आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने करु शकलो, असेही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी सरपंच जगनशेठ झांजुर्णे व सदभाऊ शेटे यांच्यासह दिवंगत सरपंच यांच्या कुटुंबातील सदस्यांचा व माजी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील खत्री यांचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ देवकर यांनी मानपत्राचे वाचन केले. मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेविका संगीता ओसवाल, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, स्नेल आवटे, नगरसेवक राहूल रघुनाथ बर्गे, परशुराम बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, सागर वीरकर, राजेंद्र वैराट, ऍड. शशिकांत क्षीरसागर, श्रीकांत बर्गे, अनिकेत सुर्यवंशी, महेश शा. बर्गे, विजय घोरपडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

[read_also content=”केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण देशाचा आत्मा : चंद्रकांत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/central-governments-new-education-policy-is-the-soul-of-the-country-chandrakant-patil-nrdm-324976.html”]

देशात सर्वप्रथम सर्व समाजांसाठी समाज मंदिरे : आ. महेश शिंदे

शहरात अनेक समाजातील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. वर्षानुवर्षे ते कोरेगावशी एकरुप झाले आहेत. त्या-त्या समाजाच्या विकासासाठी आपण शहरात १५ समाज मंदिरे उभारणार आहोत. १० ते १५ गुंठे जागेत प्रशस्त अशी ही मंदिरे उभी राहणार असून, त्याद्वारे विवाह सोहळा, धार्मिक कार्यक्रम, घरगुती कार्यक्रम तेथे होऊ शकणार आहेत. त्याचबरोबर वैकुंठ आणि कैलास दोन्ही स्मशानभूमींचे विस्तारीकरण व नुतनीकरण, लिंगायत समाजासह अन्य समाजांच्या दफनभूमीचे विषय मार्गी लावत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वच समाजघटकांसाठी वेगवेगळी समाजमंदिरे उभी करण्याचा मान कोरेगाव नगरपंचायतीला जाणार असल्याचेही आ. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प साकारले जाणार

कोरेगाव शहराचा भौतिक विकास साधला जात आहे, रस्ते व गटारांची कामे मार्गी लागली आहेत. येत्या काही वर्षात शहरातील एकही रस्ता नव्याने तयार होण्यासाठी शिल्लक राहणार नाही. तालुक्यातून नामवंत मल्ल तयार होण्यासाठी आतंरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, इनडोअर स्टेडियम, जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र पण अत्याधुनिक जीम, आझाद चौक येथे भाजी मंडई यासह अनेक नवनवीन प्रकल्प साकारले जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने ही कामे सुरु होत आहेत. या कामांद्वारे नगरपंचायतीच्या अर्थिक स्तोत्रामध्ये वाढ होणार असून, कर्मचारी समावेशनासह पगाराचा काही अंशी विषय संपणार आहे.

प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा विशेष गौरव

कोरेगाव शहराला नगरपंचायतीचा दर्जा दिल्यानंतर प्रथम नगराध्यक्षपदाची जबाबदारी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी लिलया पेलली. ग्रामविकास विभागाकडून कारभार नगरविकास विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर कामकाजात येणार्यात अडीअडचणी दूर करत त्यांनी आपल्या कार्यकालात शहराचा झेंडा दिल्ली दरबारी फडकवला. स्वच्छ व सुंदर कोरेगाव अभियानात नगरपंचायतीचा देशपातळीवर गौरव झाला. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाणी पुरवठा योजना, जुना मोटार स्टँड येथे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदीसह ठोस आणि दर्जेदार विकासकामे केली. त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. आमदार महेश शिंदे यांनी राजाभाऊ बर्गे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आणि भविष्यकाळात शहराच्या विकासामध्ये असेच योगदान द्या, असे आवाहन केले.

Web Title: Koregaon will develop solidly and independently mla mahesh shinde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2022 | 01:23 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Eknath Shinde
  • Koregaon
  • MLA Mahesh Shinde

संबंधित बातम्या

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन
1

तासगावच्या पाण्याचा ‘शब्द’ आता कृतीत; 11 महिन्यांत पाणी आणण्याचे महेश शिंदेंचे आश्वासन

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.