Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयनेचा सुपुत्र ठरला देशाचा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला १०५ गावांचा पाठिंबा

कोयनेचा सुपुत्र देशाचा हिरो ठरला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केले नसून मराठी माणसाच्या हितासाठी उठाव केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर सर्वांनी मुख्यमंत्र्यांना खंबीरपणे साथ द्यायला हवी, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला १०५ गावाने पाठिंबा दिला. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2022 | 06:37 PM
कोयनेचा सुपुत्र ठरला देशाचा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला १०५ गावांचा पाठिंबा
Follow Us
Follow Us:

मेढा : कोयनेचा सुपुत्र देशाचा हिरो ठरला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केले नसून मराठी माणसाच्या हितासाठी उठाव केला आहे. त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर सर्वांनी मुख्यमंत्र्यांना खंबीरपणे साथ द्यायला हवी, असे सांगत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला १०५ गावाने पाठिंबा दिला.

आमच्या कोयना, सोळशी कांदाटी खोऱ्याचा मुख्यमंत्री झाला. याचा आम्हाला सार्थ अभिमान असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी १०५ गावातील जनता खंबीरपणे उभी राहणार आहे. या विभागातील सुपुत्र म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेला आणि विचारांना आमचा एकमुखी पाठिंबा आणि समर्थन असल्याचा निर्णय सर्वपक्षीय कोयना, सोळशी, कांदाटी गाव समाज बैठकीत एकमताने घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा व समर्थन देण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या आहिर येथे कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील गावातील ग्रामस्थांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे व भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाबळेश्वर तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष धोंडीबाशेठ धनावडे, मार्केटयार्डचे संचालक विठ्ठलशेठ धनावडे, शिवसेना तालुका प्रमुख संजय शेलार, विभागप्रमुख लक्ष्मण कदम, उपविभाग प्रमुख शंकर कदम, उपतालुका प्रमुख बबन सकपाळ, युवासेनेचे राम सकपाळ, मधूसागरचे संचालक राजेश उतेकर, बाजार समितीचे संचालक संजय मोरे, ४३ गाव समाज अध्यक्ष कोंडीबा शिंदे, २२ गाव समाज अध्यक्ष आनंद नलावडे, जावली बँकेचे माजी सचालक बजरंग संकपाळ, चंद्रकांत संकपाळ, हरिभाऊ संकपाळ, गंगाराम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे म्हणाले, शिंदे साहेबांनी ही भूमिका का घेतली? याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. तुमची, आमची मराठी माणसांची शिवसेना संपवण्याचे कटकारस्थान सुरू होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या संस्कारात वाढलेल्या शिंदे साहेबांना ते योग्य वाटले नाही. मराठी माणसांची मान, सन्मान असलेली शिवसेना वाचवण्यासाठी साहेबांना उठाव करावा लागला.

मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. मराठी माणसाने त्या भूमिकेचे समर्थन केले पाहिजे. आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मातृभूमीत सगळ्या गावांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिला व त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यामुळे निश्चितच त्यांना बळ मिळणार आहे.

Web Title: Koyna son became a national hero 105 villages support chief minister eknath shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2022 | 06:37 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Cm Eknath Shinde
  • Koyna
  • maharashtra
  • political news

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.