Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC anti encroachment: पहाटे ३ वाजता महापालिकेचा बुलडोझर; चिखली-कुदळवाडीतील कारवाईवरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप

पहाटेच्या वेळी गुपचूपपणे केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष पसरला. या कारवाईत एकाच समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या तणावाचे रूपांतर काही वेळातच हिंसाचारात झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 04:32 PM
देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

Follow Us
Follow Us:

PCMC anti encroachment:  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मंगळवारी पहाटे चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरात धडक अतिक्रमणविरोधी कारवाई करत ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. तब्बल २८,००१ चौरस फूट क्षेत्रावरील या बांधकामांवर महापालिकेने कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली. मात्र, या कारवाईत एकाच समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, ही कारवाई होण्यापूर्वीच स्थानिक रहिवासी अर्शद अस्लम खान आणि इतर नागरिकांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निवेदन सादर केले होते. कारवाईत पारदर्शकता ठेवावी आणि कोणत्याही एका समाजाला लक्ष्य करून भेदभाव करू नये, अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, हे निवेदन देऊन काही तासांतच ९ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने कारवाई सुरू केल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

समान न्यायाची मागणी

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित केली जातात, मग चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांना असा दुजाभाव का? अनेक वर्षांपासून वास्तव्यास असूनही या भागाला पाणी, मलनिस्सारण यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कारवाईतही प्रार्थनास्थळे, दुकाने, लघुउद्योग आणि घरे जमीनदोस्त करण्यात आली होती. “जर सर्वांवर समान कायद्याने कारवाई होत असेल, तर केवळ विशिष्ट भाग आणि समाजाच्या बांधकामांवरच वारंवार बुलडोझर का चालवला जातो?” असा संतप्त सवाल अर्शद खान यांनी उपस्थित केला आहे.

स्थानिकांचा आरोप आणि पोलिसांशी झडप

पहाटेच्या वेळी गुपचूपपणे केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष पसरला. या कारवाईत एकाच समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या तणावाचे रूपांतर काही वेळातच हिंसाचारात झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या कारवाईची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सर्व अतिक्रमणांवर एकसमान धोरण राबवावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. एमआयएमच्या नेत्या रुईनाज शेख यांनीही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शहरातील इतर अनधिकृत बांधकामे सोडून केवळ विशिष्ट भागातील धार्मिक स्थळांनाच का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल केला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय; विद्यार्थी, उद्योग आणि GST बाबतीत महत्वाचे निर्णय…

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले की, शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्धची मोहीम ही शहराच्या नियोजित आणि शाश्वत विकासाचा भाग आहे. “प्रशासनाकडून कोणालाही अभय दिले जाणार नाही. कोणत्याही प्रकारची तडजोड न करता ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील,” असे आयुक्तांनी नमूद केले. या मोहिमेत महापालिकेच्या १२ कार्यकारी अभियंता, ३२ उप अभियंता, १८ कनिष्ठ अभियंता, ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्यासह ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि १५० एम.एस.एफ. जवानांचा फौजफाटा तैनात होता.

​कारवाईचा घटनाक्रम

यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये ४ हजारांहून अधिक भंगाराची गोदामे आणि मे महिन्यात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील ३६ अनधिकृत घरे महापालिकेने जमीनदोस्त केली होती. मात्र, सध्या कोणतीही निवडणूक नसताना अचानक झालेल्या या कारवाईने आणि त्यातही धार्मिक स्थळांच्या समावेशामुळे हा विषय आता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

 

Web Title: Kudalwadi illegal structures demolished pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Encroachment Issue
  • PCMC News
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट
3

PCMC मध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार; लोकसहभागातून शहर चकाचक करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.