
Kusegaon Gram Panchayat, Daund Taluka, Patas Pune
विद्यमान सरपंच वैशाली शितोळे, उपसरपंच दीपक रुपनवर यांचे ही निलंबन झाले आहे. ग्रामपंचायतीतील नियमबाह्य निर्णय व प्रशासकीय दुर्लक्ष, अनियमित कारभाराबाबत ग्रामस्थ मनोज वसंत फडतरे यानी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची सविस्तर चौकशी केल्यानंतर पुणे विभागाचे आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी ही संपूर्ण ग्रामपंचायत बॉडीच बरखास्त करण्याचे लेखी आदेश दिले.
पुणेकरांसामोर Weather पण फेल! काय ती हवा, काय ते तापमान अन्…; वाचा सविस्तर…
आयुक्तांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीतील तत्कालीन सरपंच छाया मोहन शितोळे, उपसरपंच डॉ. अमोल गणेश शितोळे, सदस्य अनिता नाना चव्हाण, किरण मनोहर गायकवाड, विनोद माणिकराव शितोळे, सुप्रिया संतोष भोसले, वैशाली रमेश शितोळे, शर्मिला मनेष शितोळे व दीपक नामदेव रुपनवर यांना पदावरून निलंबित केले. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेशाची प्रत पाठवली आहे. त्यामुळे कुसेगाव ग्रामपंचायतचा प्रशासकीय यंत्रणा कारभार पाहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामपंचायत प्रशासनाने सन २०२१-२२ या वर्षात ग्रामपंचायत कार्यालय व बाजार गाळे अष्टविनायक रस्त्यालगत बांधकाम करताना आवश्यक ना-हरकत दाखला न घेता बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप केला गेला. ग्रामपंचायत कार्यालय सुस्थितीत असताना ते पाडून नव्या ग्राम सचिवालय इमारतीसाठी शासनाचे एकूण २५ लाख रुपये अनुदान नियमबाह्य पद्धतीने खर्च केल्याचा आरोप केला गेला आहे.
धक्कादायक ! 27 वर्षीय गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; राहत्या घरातच…
ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे, प्रशासनाच्या आदेशांचा अवमान करणे, तसेच सरकारी निधीचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत या प्राथमिक चौकशीमध्ये दौंड पंचायत समिती मार्फत झालेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार, संबंधित पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. याप्रकरणी जिल्हा परिषद पुणे यांनी शासनाकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ व ५३ अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता. या सर्व प्रकारच्या चौकशीत ग्रामपंचायत कार्यालय व बाजार व्यावसायिक गाळे इमारत याचे बांधकाम करताना कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. यामुळे कुसेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सह नऊ सदस्य पदावरून हटवले आहे.