Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुसुंबी घाट… लाल फुफाट्यातून प्रवास, नवीन मोऱ्या बांधकाम ठिकाणी मातीचे ढीग; दुचाकी चालकांसाठी धोकादायक प्रवास

कुसुंबी मार्गे थेट कोकणातील खेडला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू असून हे काम करण्यासाठी मेढा ते सह्याद्रीनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 25, 2026 | 01:19 PM
कुसुंबी घाट... लाल फुफाट्यातून प्रवास, नवीन मोऱ्या बांधकाम ठिकाणी मातीचे ढीग; दुचाकी चालकांसाठी धोकादायक प्रवास

कुसुंबी घाट... लाल फुफाट्यातून प्रवास, नवीन मोऱ्या बांधकाम ठिकाणी मातीचे ढीग; दुचाकी चालकांसाठी धोकादायक प्रवास

Follow Us
Follow Us:
  • नवीन मोऱ्या बांधकाम ठिकाणी मातीचे ढीग
  • दुचाकी चालकांसाठी धोकादायक प्रवास
  • रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम
मेढा: जावळी तालुक्यातून जाणाऱ्या व थेट कोकणाला जोडणाऱ्या पाचवड मेढा ते कुसुंबी मार्गे थेट कोकणातील खेडला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू असून हे काम करण्यासाठी मेढा ते सह्याद्रीनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे. कुसुंबी ते कोळघर ह्या घाटामध्ये रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले असून यामुळे संपूर्ण रस्ता मातीने माखला आहे. परिणामी मेढ्यापासून ते सह्याद्रीनगर पर्यंतचा प्रवास लाल फुपाट्यातून लालेलाल होत करावा लागत आहे.

विशेषता ज्या ठिकाणी नवीन मोऱ्यांचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी रस्ता खोदल्याने प्रचंड मातीचे ढीग तयार होत असून याठिकाणी मातीच्या ढिगाऱ्यातून दुचाकी चालकांसाठी प्रवास धोकादायक ठरत आहे. अशा ठिकाणी मोठे खड्डे पडून वाहने घसरत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी मोऱ्यांची बांधकामे सुरू आहेत अशा ठिकाणी तरी मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करावा अशी मागणी होत आहे.

अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !

शासनाकडून पाचवड ते खेड हा महत्त्वाचा रस्ता होत असून या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. परंतु काम करत असताना आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जात नाहीत. पाणी मारण्यासाठी टँकर असले तरी ते दिवसातून किती वेळा पाणी मारतात हा संशोधनाचा विषय आहे तर मेढा – कुसुंबी ते सह्याद्रीनगर घाटात तर एवढी माती रस्त्यावर आहे की एखादे वाहन वेगाने गेल्यास धुळीचे लोट तयार होत आहेत, यातून इतर चालकांना रस्ताही दिसेनासा होत आहे.

धुळीमुळे दुचाकी चालकांसह वाहनातील इतर प्रवासी, पादचारी, शेतकरी यांचे कपडे लालेलाल होत असून अनेकांना धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचे विकार होत आहेत तर रस्त्याच्या जवळपास असणारी घरे व इतर व्यावसायिक ठिकाणे यामध्येही मातीचे थर साचत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाऱ्याच्या वेगाने ही धूळ सर्वत्र पसरत असून या परिसरातील सर्व नागरिकांना धुळीच्या त्रासाने मेटाकुटीला आणले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण होण्यासाठी अद्याप वेळ असून संबंधित ठेकेदाराने पाणी मारण्यासाठी असणारे टँकर पाणी मारताहेत की नाही याची खात्री करून रस्त्यावर दररोज पाण्याचा मारा करावा अशी मागणी होत आहे.

रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर बारीक खडीचे खडे मोठ्या प्रमाणावर असून या खडीमुळे दुचाकी व इतर गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित राहील याची काळजी संबंधित ठेकेदार ने घ्यावी अशी मागणी होत आहे.

Minor Girls Missing: अल्पवयीन मुलींच्या अपहरणात चिंताजनक वाढ; विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक

Web Title: Kusumbi ghat piles of soil at the new moraya construction site a dangerous journey for two wheeler riders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Accident
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
1

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
2

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू
3

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…
4

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.