Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2025 | 01:34 PM
maharashtra dcm eknath shinde gives reaction on india pakistan war live update

maharashtra dcm eknath shinde gives reaction on india pakistan war live update

Follow Us
Follow Us:

सोलापूर : राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 3 हजार कोटींच्या निधीला मान्यता दिलेली आहे. ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या शासनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर चालत आहे’.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा आहेत. तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

आपल्या राज्याची आर्थिक स्थिती चांगली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक महिलांना याचा फायदा होत आहे. मात्र, ही योजना बंद होईल, असे म्हटले जात होते. त्यावरही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली की, ‘आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’, असेही त्यांनी सांगितले.

सांगोल्याला भरघोस निधी

सांगोला तालुक्याचे विकासासाठी भरघोस निधी देण्यात आलेला असून, पुढील काळातही सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच सांगोला येथील एमआयडीसी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Ladki bahin yojana will not be stopped says dy cm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
1

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द
2

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कर्जमाफीची मर्यादा 50 हजारांवरून 2 लाख, ‘ही’ अटही रद्द

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार
3

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात
4

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.