Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच, २१०० रुपयांचा पत्ताच नाही; ‘गेमचेंजर’ योजनेवर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यावेळी या योजनेचे मानधन १५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 13, 2026 | 06:06 PM
लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच, २१०० रुपयांचा पत्ताच नाही; 'गेमचेंजर' योजनेवर प्रश्नचिन्ह

लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच, २१०० रुपयांचा पत्ताच नाही; 'गेमचेंजर' योजनेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • २२ हजार महिला योजनेतून बाद
  • ७२०६०३ सुमारे महिला एकूण नौदणी
  • २२ हजारांहून अधिक अपात्र अर्ज
  • ४४ पेक्षा जास्त महिला स्वेच्छेने माधार
  • ६९ ८५३६८८ सुमारे महिला पात्र लाभार्थी
अमरावती : महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली ही योजना महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यावेळी या योजनेचे मानधन १५०० रुपयांपासून ते २१०० रुपयांपर्यंत करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही खात्यात १५०० रुपयेच जमा होत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मानधन वाढविण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी ही बाढ नेमकी कधीपासून लागू होणार याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. उलट सरकारकडून लाभार्थ्यांची आर्थिक पडताळणी आणि अर्जाची फेरतपासणी सुरू करण्यात आली.

मुख्यमंत्र्याची यांची मोठी घोषणा! मुंबई-बंगळुरू ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवाशांसाठी ठरणार ‘गेम चेंजर’

अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी सुमारे ७ लाख २० हजार ६०३ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ६ लाख ९८ हजार ५३६ महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, नव्याने सुरू करण्यात आलेल्या पडताळणी प्रक्रियेत २२ हजारांहून अधिक महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांना नोकरी लागली आहे. अशा महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आले आहेत. तसेच नव्या निकषांमध्ये न बसल्याने ४४ महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे. सरकारकडून निकषांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आणि २१०० रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चारचाकी वाहनामुळे सुमारे ५९४२ बहिणी अडचणीत

योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील कुणाकडेही चारचाकी वाहन नसावे अशी अट आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात ५९४२ महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आली आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे २२ हजार ६७ महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.

मतांच्या बदल्यात मिळालेले आश्वासन हवेत विरले आहे. २१०० रुपये तर मिळाले नाहीतच, पण १५०० रुपयाचाही नियमितपणा नाही. त्थातच नवनवीन नियम लावून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती राजापेठ भारती धुळेकर यांनी दिली.

१५०० रुपये मिळतात हे चांगले रक्कम लगेच संपते. थोडी बचत करता यावी यासाठी रक्कम वाढविणे गरजेचे आहे,असं अमरावती रविनगर अश्विनी हटकर यांनी म्हटलं आहे.

खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवा म्हणून निकष कडक केले जात आहेत, मात्र त्यामुळे काही पात्र महिलांचेही अर्ज अपात्र ठरण्याचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती राजपेत प्रीती काबरे यांनी दिली.

भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट

Web Title: Ladki bahini yojana 2100 rupees delay questions raised news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Government Scheme
  • Ladki Bahini Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.