मुंबई : लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रेवेळी राज्य सरकारकरडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत (Thanked Chief Minister Uddhav Thackeray and Environment Minister Aditya Thackeray). लतादीदी गेल्याने संगीत युगांत झाला आहे. संगीतात सातच स्वर असतात पण, लता हा आठवा स्वर आहे, अशा शब्दांत हृदयस्पर्शी शब्दात लता मंगेशकर यांच्या आठवणी जागवत त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) भावुक झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर प्रथमच मंगेशकर कुटुंबियांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, संगीत महाविद्यालयाकरता लतादीदी मला दीड महिन्याने भेटणार होत्या. संगीत महाविद्यालयाला लतादीदींचे नाव असेल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा शासन निर्णय (जीआर) मंगेशकर कुटुंबाशी बोलल्यानंतर निघाला आहे. स्मारकरुपी संगीत महाविद्यालय मुंबईत कालिना येथे असेल, ३ एकर जमिनीवर हे संगीत महाविद्यालय सुरु होईल. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
[read_also content=”निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत २ मार्चनंतर : अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी https://www.navarashtra.com/maharashtra/lottery-of-women-reservation-for-elections-after-march-2-additional-commissioner-suresh-kakani-nrvb-236092.html”]
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. भारतात दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावे असे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कालिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला.
[read_also content=”एसरकडून दुसरा इंटेल पॉवर्ड मेक इन इंडिया लॅपटॉप ‘अॅस्पायर ३’ लाँच https://www.navarashtra.com/technology/acer-launches-second-intel-powered-make-in-india-laptop-with-aspire-3-nrvb-236054.html”]
त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले.